नांदेडला मुक्या प्राण्यांसाठी सरसावला मित्र परिवार

नांदेडला अनेकांनी केली प्राण्यांना मदत
नांदेडला अनेकांनी केली प्राण्यांना मदत

नांदेड - कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन झाले आहे. भारतात देखील ता. १४ एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन आता ता. तीन मे पर्यंत वाढणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत सरकार तसेच इतर सर्वजण आपआपल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. या सर्वांत जास्त हाल होत आहेत ते मुक्या जनावरांचे. त्यांच्यासाठी देखील काही जणांनी नांदेडमध्ये पुढाकार घेतला आहे. 

लॉकडाऊनमुळे सध्या गरजू आणि गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारसह अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, पक्ष आणि दानशूर व्यक्ती सरसावल्या आहेत. त्यांच्यामार्फत जेवणाची सुविधा तसेच अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र मुक्या जनावरांचे हाल होताना दिसून येत आहेत. 

मुक्या प्राणांना मिळाली मदत
सध्या मुक्या प्राण्यांचे अन्नावाचून हाल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी होळी भागातील मित्र परिवार सरसावला आहे. कोरोनाच्या आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे नागरिक घरातच असल्याने गाय, कुत्रे  यासारख्या मुक्या प्राण्यांना अन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. कोरोनाची धास्ती घेतलेल्या मानवाला स्वतःचा जीव वाचवायचे पडले आहे तेथे प्राण्यांकडे कोण बघणार? अशी परिस्थिती आहे. परंतु शहरातील होळी भागातील पशुप्रेमी श्रीराम गिरगावकर यांनी होळी मित्र परिवाराच्या मदतीने मुक्या प्राण्यांना दररोज अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 

पोळ्या जमा करुन मदत
मुक्या जनावरांसाठी मदत करण्याचा निर्णय मित्र परिवाराने घेतला. दररोज सायंकाळी प्रत्येक घरातून एक दोन पोळ्या जमा केल्या जातात. त्यानुसार दररोज सुमारे दोनशे ते तीनशे पोळ्या जमा होतात. हे सगळे अन्न या परिसरातील गाय, कुत्री व अन्य मुक्या प्राण्यांना खाऊ घातले जाते. या उपक्रमात श्रीराम गिरगावकर यांच्यासोबत सौरभ शेष, आकाश केजकर, रोहित महामुने, अथर्व, नागेश जाधव, सागर ठाकूर हे नित्यनेमाने पशुसेवा करत आहेत.

सर्वांचे मिळते सहकार्य...
लॉकडाऊनच्या काळात कुणीच बाहेर निघत नाही. त्याचबरोबर चहा, नाष्टा, जेवणाची सर्व हॉटेल बंद आहेत. बेकरी दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत मुक्या आणि मोकाट जनावरांची विशेष करुन भटक्या कुत्र्यांची आबाळ होत आहे. त्यांची अवस्था बघून आम्ही मित्रांनी हा निर्णय घेतला. त्यास नागरिकांनीही सहकार्य केले. आपण देखील आपआपल्या भागात असलेल्या मुक्या जनावरांना खाण्याची तसेच पाण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
- श्रीराम गिरगावकर, होळी, नांदेड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com