नांदेडला दानशूर व्यक्तींचा मदतीसाठी पुढाकार...

आशा वर्कर महिलांना प्रतिभा चिखलीकर यांच्या हस्ते अन्नधान्यांच्या किटसह भाजीपाल्याचेही वाटप
आशा वर्कर महिलांना प्रतिभा चिखलीकर यांच्या हस्ते अन्नधान्यांच्या किटसह भाजीपाल्याचेही वाटप

नांदेड - कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येकजण आपआपल्या परीने लढा देत आहे. सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिब, गरजू आणि कामगारवर्गाचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत सरकारसह प्रशासन तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नांदेडला देखील अनेकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह अन्नदान, अन्नधान्य किटचे वाटप आदींसाठी पुढाकार घेतला आहे. 

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच कामधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी हातावर पोट भरणा-या सर्वसामान्य नागरिकांसह गोरगरिब आणि गरजू लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांची दखल घेत कामगार, मजूर व गरजू लोकांना अन्नधान्याची मदत देऊन दिलासा देण्याचे काम दानशूर व्यक्तींकडून सुरु आहे. देशात आणि राज्यात कोरोनाविरुद्धचा लढा लढण्यासाठी सरकार, प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे समाजातील विविध पक्ष, संस्थाचे प्रतिनिधी तसेच दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. 

चिखलीकर कुटुंबियांकडून आशा वर्करांना मदत
लॉकडाऊनच्या काळात कोरोनाशी लढा देण्यासाठी महापालिका हद्दीतील आशा वर्कर महिला सुद्धा जबाबदारीने काम करत आहेत. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांची दखल घेत दिलासा दिला आहे. रविवारी सकाळी ८५ आशा वर्कर महिलांना सौ. प्रतिभा चिखलीकर यांच्या हस्ते अन्नधान्यांच्या किटसह भाजीपाल्याचेही वाटप वसंतनगर येथील निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद चिखलीकर, प्रा. संदीप वाघ, पत्रकार प्रल्हाद उमाटे, विजय निलंगेकर, राम तरटे, पवार, कुवरचंद मंडले, योगेश सुतारे आदींची उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी खासदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने ११ हजाराचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी महापौरांतर्फे गरजूंना मदत
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार दलितमित्र किशोर भवरे व माजी महापौर शीला भवरे यांनी शहरामधील अंध, दिव्यांग तसेच गरजू व गोरगरिबांना कर्तव्य म्हणून जीवनावश्यक वस्तू व धान्याचे किट वाटप केले. 

परशुराम ब्राह्मण कर्मचारी संघटनेतर्फे मदत
नांदेड शहरात परशुराम ब्राह्मण कर्मचारी संघटनेतर्फे धान्याचे वितरण करण्यात येत आहे. शनिवारी (ता. १८) आणि रविवारी (ता. १९) हडको, सिडको परिसरातील गरजू व गोरगरीब कुटुंबांना धान्याच्या ७५ किट वाटप करण्यात आल्या. यावेळी ब्राह्मण कर्मचारी संघटनेचे श्रीकांत कुलकर्णी, अनिरुद्ध शिरसाळकर, मंगेश मुळे, श्री. जामकर, श्रीकांत पांडे, उदय पाध्ये, उदय देशपांडे, गोदाश्रद्धा सेवा समूहाचे मार्गदर्शक गजानन जोशी, ज्ञानेश्वर बोंबीलवार आदींनी मदत वाटपासाठी प्रयत्न केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com