आर्धापूर ते वसमत रस्त्यावर अपघात 6 ठार; 11 जखमी

लक्ष्मिकांत मुळे
सोमवार, 29 मे 2017

अर्धापूर (नांदेड): अर्धापूर-वसमत रस्त्यावर महादेव मंदिर परीसरात रस्त्यावर नादुरूस्त झाल्यामुळे उभ्या आसलेल्या टिप्परवर टाटा सुमो आदळून सहा ठार झाले असून आकरा जखमी झाले आहेत. हा आपघात रविवारी (ता. 28) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास झाला आहे.

या आपघातात मृत व जखमी झालेले टाटा सुमोचा चालक वगळता सर्व बेंद्री तांडा (ता. भोकर) येथील एकाच कुटंबातील असून, जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात टिप्परचालक व मालकांना विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्धापूर-वसमत रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे टिप्पर (एम. एच. 18 ए ए 1478) नादुरूस्त झाल्यामुळे अर्धापूरच्या दिशेने उभे होते. या उभ्या आसलेल्या टिप्परवर वसमत कडून येणारी टाटा सुमो (एम. एच. 26 एल. 0806) आदळली. या आपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा जण ठार झाले तर आकरा जखमी झाले आहेत. घटना स्थळी वरिष्ठ पोलिस आधिकारी व पोलिस निरीक्षक विजय डोंगरे, स.पो.नि.दिपक दंतूलवार यांनी भेट देवून महिती घेतली.

मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची नावे पुढील प्रमाणे-
किसन मोतीराम जाधव, रामराव रूपसिंग जाधव, सुधाकर जयंत जाधव, जयंत रूपसिंग जाधव, जनाबाई रामराव जाधव, अर्जुन जयंत जाधव.

जखमींची नावे पुढीप्रमाणे-
1) राजु रामराव जाधव 2) बालाजी सायबु सोळंके 3) अर्चना सुधाकर  जाधव 4) वर्षा आर्जुन जाधव 5) पल्लवी आर्जुन जाधव 6) पायल आर्जुन जाधव 7) बाबू रूपसिंग जाधव 8) रूपसिंग गुंडाजी जाधव 9) कल्पना बाबु जाधव 10) मारोती बाबु जाधव 11) सचिन कैलास राठोड.

ताज्या बातम्या-

Web Title: nanded news accident in ardhapur-vasmat road, 11 dead