नांदेडात देवा दत्ता- दत्ताचा गजर घुमला

फोटो
फोटो

नांदेड -  येथिल दयानंदनगर श्री दत्त मंदीरात बुधवारी (ता.११) दत्त जयंती उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दत्त जन्मोत्सव असल्याने सकाळी सात वाजल्यापासूनच दयानंदनगर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा बाजुने सडा- सारवण करुन फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण भारावून गेले होते.

दुपारी साडेबारा वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी आरतीला महिला व भक्तजनांची मोठी गर्दी उसळली होती. दत्त जन्मोत्सवानंतर पालखिचे आयोजन करण्यात येते. तत्पूर्वी मंदीर परिसरात रंग रंगोटी करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदीर परिसर रोषणाईने उजळुन निघाला होता. शहरात सर्वात जुने दत्ताचे मंदीर जुनामोढा येथे असून, ते श्री संत बाळगीर महाराजाचे मंदीर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. दुसरे दत्त मंदीर दयानंदनगर येथे आहे. या मंदीरात भाविक मोठी गर्दी करतात. तर शहरातील तिसरे दत्त मंदीर आनंदनगर येथे आहे.


महाप्रसादाचे वाटप केले जाते


दत्ताची पालखी मिरवणूक पार पडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे कुणाकडून देणगी मागितली जात नाही. शहरातील भक्तानी स्वतः दत्त मंदीर संस्थानकडे अणून दिलेल्या तेल, तुप, गहू, तांदुळ दाळ स्वरुपातुन जमा झालेल्या अन्नधान्यापासून महाप्रसाद तयार करुन महाप्रसादाचे वाटप केले जाते. दत्त जयंती ही हिंदू पंचागानुसार मार्गशीर्ष महिण्यात पौर्णिमेला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तीन तोंडे सहा हात, दोन पाय चतुर्वेददर्शक चार श्वान, सोबत कामधेनु (गाय), श्री दत्त महाराज हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे आवतार मानले जातात. त्यांनी दिनदलितांची सेवा करणे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे महान कार्यकेले आहे. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे दत्तयांचे तीन आवतार मानले जातात.

असा होतो जन्मोत्सव ः


दत्त जयंतीला दत्ताच्या देवळात दिवसभर भजन किर्तनासोबतच दत्ताचा पाळणा जोजवून आरती करण्यात येते. त्या नंतर दत्ताची पालखी मिरवणूक काढण्यात येते. केवळ शहरात नव्हे तर गाव खेड्यात देखिल उत्सव मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. सध्या काळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

ही आहेत प्रसिद्ध दत्तस्थान ः


प्रयाग, औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, करपूर आणि वर्दळीवन या ठिकाणी दत्ता यांचे प्रसिद्ध देवस्थान आहेत.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com