esakal | Video : राष्ट्रीय संगीत, नृत्य स्पर्धेत तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News

Video : राष्ट्रीय संगीत, नृत्य स्पर्धेत तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : महाराष्ट्रातील लावणी या नृत्याबरोबरच हरियाणा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांतील लोककलांचे दर्शन... कीर्तन आणि कथ्थकचे एकत्र सादरीकरण... दमदार गायनातून यमन, रामकलीसह नानाविध रागांचे खुलवले जाणारे सौंदर्य... चित्रपट गीतांवर सादर होणारे रंगतदार नृत्य... कधी शिट्ट्या, तर कधी टाळ्यांच्या कडकडाटातून प्रत्येक सादरीकरणाला मिळणारी दाद... अशा वातावरणात राष्ट्रीय संगीत नृत्यस्पर्धेचा दुसरा दिवस सोमवारी (ता. 27) चांगलाच रंगला.

अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय संगीत, नृत्य स्पर्धेला रविवारपासून (ता. 26) सुरवात झाली. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धकांनी शास्त्रीय गायन सादर करून रसिकांची मने जिंकली.

यानिमित्ताने श्री, केदार, यमन, मियॉं की तोडी अशा नानाविध रागांची मेजवानी श्रोत्यांना अनुभवता आली. त्यानंतर लगेचच सुगम गायन स्पर्धा झाली. राम का गुणगान करिये, अवघा रंग एक झाला, अवघे गरजे पंढरपूर... अशी विविध गीते स्पर्धकांनी मोठ्या कौशल्याने सादर केली.

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 27) विविध राज्यांतील स्पर्धकांनी शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यानंतर आपापल्या भागातील लोककला सादर करून स्पर्धेत आपला ठसा उमटविला. यानिमित्ताने भारतातील लोककलेचे अनोखे दर्शन लातूरकरांना अनुभवता आले. या कलाविष्कारात श्रोत्यांची मने तल्लीन झाली. स्पर्धेची मंगळवारी (ता. 28) सांगता होणार आहे.

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय