esakal | केंद्र शासनाच्या विरोधात `राष्ट्रवादी`चे गोट्या खेळो आंदोलन, लातुरात अनोख्या पद्धतीने निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Gotya Khelo Andolan

केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात शेतकरी विरोधी कायदा केला. तसेच कामगार विरोधी कायदा देखील मंजूर करून घेतला आहे.

केंद्र शासनाच्या विरोधात `राष्ट्रवादी`चे गोट्या खेळो आंदोलन, लातुरात अनोख्या पद्धतीने निषेध

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदा मंजूर केल्याने कामगार वर्गात असंतोष पसरला आहे. या कायद्याला विरोध होऊ लागला आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. २८) येथे ‘गोट्या खेळो’ आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात शेतकरी विरोधी कायदा केला. तसेच कामगार विरोधी कायदा देखील मंजूर करून घेतला आहे.

हे कायदे मंजूर झाल्याने याचे दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत येणार आहेत, तर कामगारावर बेरोजगाराचे मोठे संकट येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी येथे ‘गोट्या खेळो’ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातून औरंगाबादकडे पदयात्रा रवाना

केंद्र सरकारच्या निषेधार्थ गोट्या खेळण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष फिरोज शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष जितेंद्र गायकवाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल विहिरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेखा कदम, सेवादल अध्यक्ष रामभाऊ रायेवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेश खटके, योगेश नरवडे, अभिलाष पाटील, जहांगीर शेख, निखिल मोरे, इरफान बागवान, बबलू तोडकर, सोहम गायकवाड, बसवेश्वर रेकुळगे, गोविंद फड, अहरार हक्कानी, बाबा मोमीन, अमित पाटील, कबीर शेख, आबा सूर्यवंशी, आकाश गायकवाड, नवनाथ भोसले, विश्वजित सांगवे, राणा चव्हाण, हनुमंत राजपूत, आदील खान, विकास जाधव, सुरज बनसोडे, अझीम काझी आदी सहभागी झाले होते.

शासकीय यंत्रणा, माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली

संपादन - गणेश पिटेकर