Beed
Beed sakal

Maharashtra Politics : मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडेच जिल्हयात आगमन

मतदारसंघात आल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या भाषणात काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

परळी वैजनाथ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते जिल्ह्यात गुरुवारी (ता.१३) प्रथमच येत असून या निमित्ताने येथे सायंकाळी सत्कार व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई येथून ते दुपारी बारा वाजता आष्टी तालुक्यातील कडा येथे पोचतील. कड्यापासूनच आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर यांच्या पुढाकारातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या स्वागत-सत्काराची जोरदार तयारी केली आहे.

कडा, आष्टी येथे स्वागतानंतर धनंजय मुंडे श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर कुसळंबमार्गे पाटोदा येथे येतील.

Beed
Beed : जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य सेवा मिळवून देणार की यंत्रणेचा भाग होणार ?

येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर यांनी धनंजय मुंडे यांचे विविध ११ ठिकाणी स्वागत कार्यक्रम आयोजित केले आहेत. मांजरसुंबा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण शिंदे यांच्याकडून स्वागत झाल्यानंतर श्री.मुंडे यांचे बीड शहरात आगमन होईल.

बीड येथे सभापती बळीराम गवते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य विविध स्थळी स्वागत-सत्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर वडवणी येथे स्वागत होईल.

तसेच तेलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांची सदिच्छा भेट व सत्कार घेऊन, धारूर, केज अंबाजोगाई या मार्गाने धनंजय मुंडे हे परळीत दाखल होतील. सायंकाळी सहा वाजता नाथ रोडवरील यात्रा मैदानात सत्कार व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Beed
Local Body Elections : राष्ट्रवादीतील फुटीने दोन गट ; उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण होणार

भाषणाकडे सर्वांचेच लक्ष

ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनात परळीतील जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग्ज लागलेले असून जत्रा मैदानात भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेली एकंदरीत राजकीय परिस्थिती, राज्यातील सत्तेत सामील होण्याचा निर्णय यानंतर प्रथमच मंत्री होऊन स्वतःच्या मतदारसंघात आल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या भाषणात काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com