कधी सुटणार जेवणाचा तिढा : काय आहे प्रकरण वाचा 

शिवचरण वावळे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

गाव-खेड्यातील मुलांनी शिकून उंच झेप घ्यावी, यासाठी शासनस्तरावर विविध योजना आहेत. परंतु, या योजना मुलांपर्यंत पोचतच नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

नांदेड : गाव खेड्याची शेकडो मुले - मुली शिक्षणासाठी शासकीय वसतीगृहात तसेच भाड्याच्या (किरायाच्या) खोलीत राहुन शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब

oison-mixed-well-indalkarwadi-jalna-252884" target="_blank">https://www.esakal.com/marathwada/poison-mixed-well-indalkarwadi-jalna-252884आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत रहिवास, भोजन, शैक्षणिक साहित्य भत्ता दिला जातो. मात्र सद्यस्थितीत मंत्रिमंडळाची स्थापना उशिराने झाल्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या तीन महिण्यापासून कुठलाही भत्ता मिळाला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा तिढा सुटला, आता जेवणाचा तिढा कधी सुटणार अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जेवण, राहणे आणि शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरात राहुन शिक्षण घेणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे मागील तीन महिण्यापासून वसतीगृह बाह्य विद्यार्थी व विद्यार्थी संघटना सामाजिक न्याय भवनातील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात खेटे मारत आहेत. मात्र आयुक्तांकडून कधी मंत्रिमंडळ तर कधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याचे तोंडी सांगुन विद्यार्थ्यांना परत पाठविले जात आहे. तीन महिण्यापासून शासकीय उत्तर ऐकुण विद्यार्थीदेखील कंटाळले आहेत.

 हेही वाचा...नवरा-बायकोच्या भांडणात गावाचा जीव धोक्‍यात

 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी प्रतिक्षा कायम
निवडणूका होऊन अनेक दिवस मंत्रिमंडळ स्थापन होत नव्हते, त्यामुळे शासकीय स्तरावरुन मंत्रिमंडळच स्थापन झाले नाही; असे उत्तर मिळत होते. आता मंत्रिमंडळ स्थापन झाले, तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही; असे सांगुन विद्यार्थ्यांची बोळवण केली जात. परंतु मंत्रिमंडळ स्थापन झाले अन विस्तारही झाला; तरीही विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन (स्टायपन) चा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेवर विसंबुन असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतिक्षा कायम आहे. 

हेही वाचलेच पाहिजे...आजपासुन होट्टल महोत्सव; काय आहे महत्व ते वाचा

आपत्ती विशेष निधीचा वापर कधी?

जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा तातडीचा निधी हा उपलब्ध असतो. जेव्हा कुणी संकटात सापडतो तेव्हा प्रशासन विशेष निधीच्या माध्यमातुन संबंधितांच्या गरजा भागविते. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थीसुद्धा जेवण आणि राहण्याच्या सुविधा पूर्ण होत नसल्याने झगडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर यापेक्षा मोठी आपत्ती दुसरी असूच शकत नाही. असा सूर विद्यार्थी संघटनाकडून आवळला जात आहे. विद्यार्थ्यांच्या जेवण आणि राहण्याचा प्रश्न सोडण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावित अशी मागणी जोर धरू लागली आहे.

युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन करणार आंदोलन    

तीन महिण्यापासून विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ न मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पाल्यांना शिक्षणासाठी शहरात ठेवायचे की गावी घेवून जावे काही कळत नाही. प्रशासनाकडून होत असलेली विद्यार्थ्यांची हेळसांड बघुन विद्यार्थी संघटनांनी देखिल टोकाची भूमिका घेतली असून, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर स्वाधार योजनेचा लाभ न मिळाल्यास युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने  यांनी दिला आहे.

                विष्णुपंत एडकेवार (मराठवाडा अध्यक्ष)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Never miss a meal: Read the Case What is