सर्वांनाच धक्का : सहा दिवसांपूर्वी झाले लग्न, आता नववधू...

अविनाश काळे
Sunday, 24 May 2020

शहरात दोन व तालुक्यात एक असे तीन पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता येथील रूग्ण संख्या पाचवर गेली आहे. दरम्यान कर्नाटकातील त्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील एक पुरुष, उमरग्यात नुकतेच लग्न झालेली नववधू तर केसरजवळग्याची एक महिला पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद): शहरात दोन व तालुक्यात एक असे तीन पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता येथील रूग्ण संख्या पाचवर गेली आहे. दरम्यान कर्नाटकातील त्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील एक पुरुष, उमरग्यात नुकतेच लग्न झालेली नववधू तर केसरजवळग्याची एक महिला पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरात मुंबई (कांदिवली) येथून खाजगी बसने दाखल झालेल्या लोकांसमावेत असलेली एका महिलेचा अहवाल २१ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने महिलेच्या संपर्कातील सात लोकांचा स्वॅब तपासणीला पाठवला होता. त्यात एका तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर अस्वस्थ वाटू लागल्याने २२ मे रोजी उमरग्याच्या कोविड रूग्णालयात दाखल केलेल्या केसरजवळग्याच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नववधूचा काका पॉझिटिव्ह, आता नववधूही
गेल्या पाच- सहा दिवसापूर्वी शहरात मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या लग्न सोहळ्याला नववधूचा काका आला होता तो सोलापूरात पॉझिटिव्ह आल्यानंतर उमरगा शहरातील त्या सात नातेवाईकांचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात नववधूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने रविवारी रात्री उशीरा आयुलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. नववधूचे घर गुंजोटी रस्त्यावरील जैनमंदिराजवळ घर आहे. दरम्यान तीनही रुग्णाना स्वंतत्रपणे उपचार सुरू करण्यात आले आहे अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ.पंडीत पुरी यांनी दिली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly Married Girl CoronaVirus Positive Report Osamanabad News