आरटीओच्या खात्यावर, बुडवलेल्या वाहनाचा कुणी भरला कर 

अनिल जमधडे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपिक महिलेने अधिकार नसताना, बेकायदा स्वत:चा लॉगिन आयडी वापरुन परस्पर व्यवहार केले. या प्रकाराने शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले आहे. वाहनांचे टॅक्‍स परस्पर क्‍लीअर करण्यात आले. टॅक्‍सी टु प्रायव्हेट पासिंग करुन देणे, वाहनांचे टॅक्‍स परस्पर क्‍लीअर करुन देणे, वित्तीय संस्थानी ओढून आणलेल्या वाहनांचा फायनान्सरच्या नावाने करताना परस्पर आरसी दुय्यम प्रत देणे असे प्रकार केले आहेत

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा फार्स सुरु आहे. असे असतानाच, भ्रष्टाचारातील एका वाहनाचा तब्बल दिड लाख रुपयांचा बुडवलेला कर अचानक आरटीओच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. हा कर कुणी जमा केला याबद्दल उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. 

आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात महिला लिपिकाने तब्बल पंधरा लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे. 

हेही वाचा : आरटीओची संशयास्पद प्रक्रिया 

चौकशी समिती कशासाठी 

अपहाराच्या चौकशीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांची समिती नेमण्यात आली. या प्रकरणात अद्यापही चौकशी पूर्ण करुन कारवाई करण्यात आली नाही. उलट अपहार करणाऱ्यांना वाचवण्याचे धोरण सुरु ठेवण्यात आले आहे. आरोपात तथ्य नसल्याचे मैत्रेवार यांनी सांगीतले होते, तर मग तीन अधिकाऱ्यांनी केलेली तक्रार खोटी होती का असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

तीन अधिकारी खोटे कसे! 

तीन अधिकारी खोटी तक्रार करत असतील तर त्यांच्यावर कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र श्री. सदामते यांनी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली नाही. या प्रकरणाचे भिजत घोंगडे असतानाच भ्रष्ट कारभारातील एका अवजड वाहनाचा अचानक दिड लाख रुपयांचा कर आरटीओ कार्यालयाच्या खात्यात भरण्यात आल्याची चर्चा आरटीओ कार्यालयाच्या परिसरात सुरु झाली आहे. ही रक्कम कुणी भरली असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. 

हेही वाचा : आस्तिक कुमार पांडे नविन मनपा आयुक्त 

काय आहे अपहार 

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात कनिष्ठ लिपिक महिलेने अधिकार नसताना, बेकायदा स्वत:चा लॉगिन आयडी वापरुन परस्पर व्यवहार केले. या प्रकाराने शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले आहे. वाहनांचे टॅक्‍स परस्पर क्‍लीअर करण्यात आले. टॅक्‍सी टु प्रायव्हेट पासिंग करुन देणे, वाहनांचे टॅक्‍स परस्पर क्‍लीअर करुन देणे, वित्तीय संस्थानी ओढून आणलेल्या वाहनांचा फायनान्सरच्या नावाने करताना परस्पर आरसी दुय्यम प्रत देणे असे प्रकार केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about rto