esakal | जिल्हा परिषद शाळेत दारूड्याचा धिंगाणा

बोलून बातमी शोधा

भूम : हांगेवाडीतील दारूड्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देताना विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक आदी.

हांगेवाडी (ता. भूम) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दारूड्याने हैदोस घातल्याने शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले. शिक्षकाला दमदाटी करीत बघून घेतो, अशी धमकी देत अर्वाच्य भाषेत तो बोलू लागल्याने शाळेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी तहसीलदारांच्या दालनात जाऊन व्यथा मांडली. शिवाय भूम पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे.

जिल्हा परिषद शाळेत दारूड्याचा धिंगाणा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळेत एका दारूड्याने चांगलाच धिंगाणा घातला आहे. अरेरावी करीत शिक्षकाला दमदाटी केल्याने विद्यार्थ्यांनी या दारूड्याचा धसका घेतला आहे. हांगेवाडी (ता. भूम) येथे सोमवारी (ता. दहा) हा प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
हांगेवाडीत पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा असून, दोन शिक्षक आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली होती. शाळेत एकूण 18 विद्यार्थी होते. सकाळपासून शाळेचे कामकाज व्यवस्थित सुरू होते. दुपारी तीन ते चारच्या सुमारास एकजण शाळेत दारू पिऊन आला.

असे अडकले राज ठाकरे औरंगाबादच्या ट्राफिकमध्ये

शिक्षक महादेव बोंदर यांच्या शर्टाला धरून दमदाटी करू लागला. दारूड्याने हैदोस घातल्याने शाळेतील विद्यार्थीही भयभीत झाले. बघून घेतो, अशी धमकी देत अर्वाच्य भाषेत बोलू लागल्याने शाळेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकारानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी तहसीलदारांच्या दालनात जाऊन व्यथा मांडली. शिवाय भूम पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दारूड्या हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याचा धसका शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतल्याने चर्चा आहे.

आदित्य ठाकरे यांचे औरंगाबादेत वक्तव्य

 
दरम्यान, शाळेत विद्यार्थ्यांसमोर असा धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार समजल्यानंतर पालकांनीही तीव्र संताप व्यक्‍त केला.