News about social media trends
News about social media trends

Lockdown : हो खरंच! लॉकडाउनमध्येही 'मुस्काराया इंडिया', कारण...

पूर्णा (जि. परभणी) : सोशल मीडियातून कुणी ना कुणी रोज आपली मैत्रिणी, आई, बहीण, काकू, पत्नी यांना वेगवेगळे चॅलेंज देत आहे. हे चॅलेंज महिला, तरुणी, मुली स्वीकारत आहेत. त्यातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे; पण त्याहीपेक्षा शतकानुशतकांपासून चार भिंतीआड चूल आणि मूल एवढ्यापुरत्याच मर्यादित असलेल्या महिला यामुळे का होईना स्वतःच्या भाव-भावनानांही महत्त्व देत असल्याचे चित्र आहे. स्वाभाविकच हा ट्रेंड पाहून आता खरंच ‘मुस्काराया इंडिया’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

लॉकडाउन म्हणजे अनेकांना शिक्षाच वाटत आहे. जणू चार भिंतीत नजरकैदेत ठेवले की काय, अशी भावनाही अनेकांची होत आहे; पण असा विचार करणाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतांश मध्यमवर्गीय लॉकडाउन काळात आपले छंद जोपासत आहेत. कधी नव्हे ते आपल्या आवडी-निवडीला प्राधान्य देत आहेत. त्यात महिला तरी मागे कशा असणार. रोज कुणा ना कुणाकडून मिळणारे चॅलेंज स्वीकारून त्या विरंगुळा मिळवत आहेत; पण त्यातून स्वतःकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलत आहे. हा बदल समाजासाठी मोठा आहे. 

ताणतणाव दूर होतो 
नटणे, मुरडणे हा स्त्रीचा मूळ स्वभाव आहे. पाककला तर तिला शिकावीच लागते; पण या ट्रेंडच्या माध्यमातून महिला मुक्तपणे सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यातून त्यांचा ताणतणावही दूर होत आहे. याबाबत डॉ. पल्लवी बारटक्के म्हणाल्या, ‘‘लॉकडाउनमुळे सातत्याने घरात राहिल्याने आलेला कंटाळा यानिमित्त दूर होण्यास मदत होत आहे.’’ 
  
असे आहे चॅलेंज 
सोशल मीडियात रोज नवनवा विषय ट्रेंडमध्ये येत आहे. त्यात नथीचा नखरा, चुडियां खनके, कलरफुल्ल साडी, मोकळे केस, अंबाडा, गजरा, विविध अलंकार, गॉगल फोटो, बेस्ट फोटो, ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो, स्टायलीशपणा, झुकी नजर, स्मोकी आईज चेअरमनफुल्ल क्लोजअप स्माईल असे अनेक चॅलेंज रोज दिले जात आहेत. ज्या महिलेला, तरुणीला हे चॅलेंज मिळाले तिने ते स्वीकारायचे. उदाहरण द्यायचे झाल्यास नथीचा नखरा या चॅलेंज स्वीकारले तर नथ घालून फोटो काढायचा तो स्टेट्स, डीपी म्हणून ठेवायचा असा हा चॅलेंजचा ट्रेंड आहे. यात ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हाही चॅलेंजचा विषय आहे. 

कोरोनाचे संकट ओढवलेले असताना दुःखातही सुख शोधण्याचे काम महिला करीत आहेत. लॉकडाउनमुळे घरातील लहान मोठे सर्व कंटाळलेत. याही परिस्थितीत स्वतः आनंदी राहायचे व सर्वांना आनंदी ठेवण्याचे काम गृहिणी करीत आहेत. त्यासाठी महिलांनी चॅलेंज हा आगळा-वेगळा ट्रेंड सुरू केला आहे. त्यातून आनंदी राहा हा संदेशही दिला जात आहे. 
- विद्या शृंगारे, क्षेत्रीय समन्वयक, संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र, पूर्णा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com