esakal | निलंगा तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींचे आरक्षण १९ नोव्हेंबरला, दिग्गजांची मोर्चेबांधणी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch

निलंगा तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण येत्या गुरूवारी (ता.१९) होणार असून अनेक दिग्गजांचे याकडे लक्ष लागले आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे त्या गावातील पुढाऱ्यांकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे.

निलंगा तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींचे आरक्षण १९ नोव्हेंबरला, दिग्गजांची मोर्चेबांधणी सुरू

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : निलंगा तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण येत्या गुरूवारी (ता.१९) होणार असून अनेक दिग्गजांचे याकडे लक्ष लागले आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार असल्यामुळे त्या गावातील पुढाऱ्यांकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. केंद्र सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले असल्याने ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून विकास कामासाठी केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत आहे. त्यामुळे या संस्था आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी गावातील पुढाऱ्यांकडून तयारी केली जात आहे. तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण सोडण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून कोणत्या प्रवर्गासाठी सरपंचपद सुटणार याकडे लक्ष लागले आहे. 

भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा


तालुक्यातील ११६ एकुण ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी ११, तर महिलांसाठी दहा असे २१ सरपंचपदे आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकुण पाच ग्रामपंचायती आरक्षित असून तीन महिला व दोन अनुसूचित जमातीसाठी असणार आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १६ पदे आरक्षित राहणार आहेत. महिलांसाठी १५ असे एकुण २१ पदे आरक्षित राहणार आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी २९ तर महिलासाठी तीस अशा एकुण ५९ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण आरक्षित राहणार आहे. कोणती गावे कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार आहेत. याकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
.
अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुका लवकरच जाहीर होणार असून प्रभाग रचना झाली आहे. शिवाय प्रभागातील सदस्यपदांचे आरक्षणही जाहीर झाले असून गाव पातळीवर अनेक दिग्गज निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. त्यामध्ये नणंद, माळेगाव-जे, कोकळगाव, उस्तुरी, वाक्सा, माळेगाव क, टाकळी, पिरूटेलवाडी, केळगाव, हाडगा, ताजपुर, गौर, सावरी, बसपूर , वळसांगवी, हंद्राळ, होसुर, शिरोळ, नदीवाडी, हंचनाळ, तगरखेडा, डांगेवाडी, अंबुलगा मेन, आनंदवाडी-गौर, शिऊर, आनंदवाडी-अबु, डोंगरगाव-हा, कासार शिरशी रामतीर्थ, गुराळ, लांबोटा, ताडमुगळी, सरवडी, बडूर, औराद शहाजानी, जाजणूर, मुदगड-एकोजी, ढोबळेवाडी- माचरटवाडी, उमरगा, वाडीशेडोळ, हासोरी-बु, वांजरवाडा, बामणी, कासारबालकुंदा, बुजरूकवाडी, कोराळी, आंबेवाडी-मसलगा आदी गावांचा समावेश आहे.

Diwali 2020 : कोरोनाच्या काळात नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाला असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यादृष्टीने गावातील प्रमुख कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये औरद शहजानी, कासारशिर्शी, कासारबालकुंदा, सरवडी, केळगाव यासह आदी मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने येथे मोठ्या चुरशीची निवडणूक होणार आहे. शिवाय येथील पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीच्या निवड प्रक्रियेमध्ये उपसभापतीपदी हे औराद शहाजानी येथे देण्यात आले असून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने व तेथील निवडणूक असल्यामुळे येथे उपसभापतीपद देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या दृष्टीने तयारी चालल्याचे चित्र दिसत आहे. 

नवी की जुनी पद्धत कार्यकर्ते संभ्रमात
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पूर्वीची पद्धत बंद करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनतेतून थेट सरपंच निवडीचे कायदा केला होता. त्या अनुषंगानेच तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. मात्र सध्याच्या महाविकास आघाडीने हा कायदा रद्द करून जुन्या पद्धतीने वार्डनिहाय निवडणूक व सदस्यातून सरपंचपद अशी जुनी पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुका नव्या पद्धतीने की जुन्या पद्धतीने होणार याबाबत गावपातळीवरील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

संपादन - गणेश पिटेकर