निम्न तेरणाचे १४ दरवाजे उघडल्याने धोका वाढला; पन्नास कुटुंबांना हलवले, गावांना सतर्कतेचा इशारा

Nimna Terna Dharan
Nimna Terna Dharan

निलंगा (जि.लातूर) : माकणी (ता.लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडल्यामुळे तेरणा नदीचे पात्रातील पाण्याचा प्रवाह दुप्पटीने वाढणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय निलंगा तालुक्यातील नदीकाठचे गावातील ५० कुटुंबे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत. तालुक्यातील पोलिस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.


गिरणा नदीचा प्रवाह निलंगा तालुक्यातून जातो. तालुक्यातील मोठी कार्यक्षेत्र या नदीने व्यापलेली आहे. निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा, कोकळगाववाडी, कोकळगाव, रामतीर्थ, मदनसुरी, जेवरी, सांगवी, बामणी, धानोरा, यलमवाडी, लिंबाळा, पिंपळवाडी, हाडोळी, गुंजरगा आदी गावे नदीकाठची असून तेरणा प्रकल्पाचे १४ दरवाजे बुधवारी (ता.१४) दुपारी तीन वाजता उघडण्यात आले आहेत. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे तेरणा नदीच्या पाण्याचा प्रवाह दुप्पटीने वाढणार आहे. त्यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहेत.

तालुक्यातील गुंजरगा येथील १०, रामतीर्थ २५ , यलमवाडी पाच, कोकळगाव पाच व पिंपळवाडी येथील पाच असे एकूण ५० कुटुंबांना पाण्याचा धोका होईल म्हणून त्याला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी मांजरा नदीचे पात्र कोणी ओलांडू नये, असे आव्हान करण्यात आले आहे. कासारशिरशी, औरादशहाजानी व निलंगा पोलीस ठाण्याला रात्रभर चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय तहसील कार्यालयातील रात्रभर आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले असून अतिवृष्टीच्या व पाण्याच्या प्रवासाची माहिती या कार्यालयाशी संपर्क साधून करावे, असे आवाहन तहसीलदार गणेश जाधव यांनी केले आहे. प्रत्येक गावातील तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना पाण्याच्या प्रश्नांबाबत अतिवृष्टी बाबतच्या सतर्कतेच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निम्न तेरणा प्रकल्प
१) पाणी पातळी - ६०४.४० मी
२) एकूण साठा - १२१.१८८दलघमी
३) उपयुक्त साठा - ९१.२२१दलघमी
४) उपयुक्त साठा टक्केवारी- १०० टक्के
५) उघडण्यात आलेल्या दरवाजांची संख्या- १४
६)धरणातुन चालू विसर्ग - ७५०.७०घमी/सेंकद /२६५१०.०० क्युसेक

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com