औरंगाबादकडे जाणाऱ्या बसवर मनसेने लावले संभाजीनगरचे स्टिकर्स

महेश गायकवाड
Saturday, 15 February 2020

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा जुना मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढे केला आहे. यासाठी मनसेने औरंगाबादऐवजी संभाजीनगर असे म्हणावे, असे जनआंदोलन हाती घेतले आहे.

जालना : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा जुना मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढे केला आहे. यासाठी मनसेने औरंगाबादऐवजी संभाजीनगर असे म्हणावे, असे जनआंदोलन हाती घेतले आहे.

या आंदोलनाचा भाग म्हणून मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.14) जालना बसस्थानकातून औरंगाबादकडे जाणाऱ्या एस.टी. बसेसवर 'जालना ते संभाजीनगर' असे स्टिकर्स लावण्यात आले. 

राज ठाकरे यांनी अर्ध्यातच का गुंडाळला दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहूल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. जालना मध्यवर्ती बसस्थानकात मनसेचा झेंडा व फलक हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात करत मनेसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एस.टी. बसेसवर संभाजीनगरचे स्टिकर्स लावले.

'औरंगाबाद नको, संभाजीनगर म्हणा' अशा घोषणाही यावेळी देण्याात आल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांची एका ठिकाणी गर्दी झाली होती.

उद्धव ठाकरेच करणार औरंगाबादचे संभाजीनगर

या आंदोलनात शरद मांगधरे, महेश नागरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संजय राजगुरे, प्रमोद म्हस्के, अजय मोरे, पंकज घोगरे, अमोल जाधव, गणेश धांडे, आकाश जाधव, मयूर बुजाडे, आकाश खरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Aurangabad Say Sambhajinagar Mission By MNS Raj Thackeray Jalna Aurangabad News