बीडकरांचे नशीबच... आणखी आठ स्वॅबचे अहवालही निगेटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

कोरोना विषाणूच्या फैलावासाठी जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणांनी घेतलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यात नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचे फलित म्हणून गुरुवारपर्यंत (ता.दोन) जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.

बीड : कोरोना विषाणूच्या फैलावासाठी जिल्हा प्रशासनातील विविध यंत्रणांनी घेतलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यात नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचे फलित म्हणून गुरुवारपर्यंत (ता.दोन) जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. बुधवारी (ता.एक) पाठविलेल्या आठ स्वॅब नमून्यांचे अहवालही निगेटिव्ह आले. दरम्यान, यात सर्वाधिक परदेशातून परतलेल्यांचा समावेश होता. 

जिल्ह्यात आतापर्यंत ४० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना केल्या. बाहेर जिल्ह्यांतून परतणाऱ्या ५३ हजारांहून अधिक नागरिकांची १४ तपासणी नाक्यांवर प्राथमिक पाहणी करण्यात आली. त्यांचा एकत्रित डेटा असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

त्याच बरोबर गावपातळीवर देखील आशा, अंगणवाडी सेविकांनी पाहणी केली. गरज असलेल्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. दरम्यान, खोकला व तत्सम लक्षणे असलेल्या साधारण ४०० लोकांना होम क्वारंटाईन केले होते. वरचेवर होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या घटत गेली. आता बाहेरुन आलेल्यांचे फेर सर्व्हेक्षणाचे कामही सुरु झाले आहे. 

तबलीगला गेलेल्यांसह परदेशातून परतलेल्यांचेही नमुने निगेटिव्ह 

दरम्यान, जिल्ह्यातील नऊ लोकांनी दिल्ली येथील तबलीग या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यातील दोघे जिल्ह्यात परतले असून उर्वरित सात जण बाहेरच आहेत. बीड पोलिसांनी त्यांचेही ठिकाण शोधून त्या-त्या जिल्ह्यातील यंत्रणेला माहिती दिल्याने त्यांच्यावरही निगराणी ठेवण्यात आली आहे.

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

दरम्यान, परतलेल्या दोघांपैकी एकाला अंबाजोगाईच्या स्वाराती तर एकाला बीडच्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आणून त्यांचे स्वॅब घेतले हेाते. यासह परदेशातून आलेल्या इतरांचे मागच्या दोन दिवसांत नऊ स्वॅब घेतले होते. यातील एकाचा अहवाल बुधवारीच निगेटीव्ह असल्याचे कळाले होते. उर्वरित आठ नमुन्यांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. सर्वच अहवाल निगेटिव्ह आढळले.

जिल्ह्यात परदेशातून आले ७६ जण

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातून परदेशात गेलेले ७६ नागरिक परतले आहेत. यामध्ये बाधित असलेल्या युएसए, कुवेत, ओमान, युएई या देशांसह कोरोनाची कमी तिव्रता असलेल्या मलेशिया, इजिप्त, रशिया आदी देशांतून आलेल्यांचाही समावेश आहे.

आतापर्यंत ४० स्वॅबची तपासणी

दरम्यान, कोरोना विषाणूची प्रखर बाधा झालेल्या आणि कमी बाधा झालेल्या देशांतून परतलेल्या नागरिकांसह इतर काही अशा ४० जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यात जिल्हा रुग्णालयामार्फत २१ तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालया मार्फत १९ अशा ४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Coronavirus Positive In beed Maharashtra News