लातूर : क्षेत्रीय कार्यालयातच मिळणार नाहरकत प्रमाणपत्र

हरी तुगावकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

लातूर : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठीचे सर्वांनाच वेध लागले आहेत. शहरात शेकडो गणेश मंडळेही कामाला लागली आहेत. सार्वजनिक गणेश
मंडळाना महापालिकेच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज असते. आतापर्यंत या
परवान्याकरीता महापालिकेत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱयांची गर्दी होत असे.

अनेक वेळा हेलपाटे मारूनही हा परवाना मिळत नसे. गणेश मंडळाच्या
पदाधिकाऱयांची ही अडचण लक्षात घेवून आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी
यावर्षी प्रथमच शहरातील क्षेत्रीय कार्यालयातच गणेश मंडळांना नाहरकत
प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे.

दरवर्षी शहरात विविध भागात सार्वजनिक गणेश मंडळाची स्‍थापना करण्‍यात येत असते. सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणेश उत्‍सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक रस्‍त्‍यांवर किंवा खासगी जागामध्‍ये मंडप उभारुन गणेशाची स्‍थापना करण्‍यात येते. सार्वजनिक गणेश मंडळ स्‍थापनेसाठी तसेच मंडपाकरीता विविध कार्यालयाच्‍या नाहरकत प्रमाणपत्राची अवश्‍यकता असते. गणेश मंडळांना विविध कार्यालयाच्‍या परवानगीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. गणेश मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांना गणेश उत्‍सवाची तयारी
करण्यासाठी त्‍यामुळे वेळ मिळत नाही. आतापर्यंत महानगरपालिकेमध्‍ये गणेश उत्‍सवासंदर्भातील सर्व परवानग्‍या किंवा नाहरकत प्रमाणपत्रे मुख्‍य
कार्यालयामध्‍येच दिली जात असत. त्‍यामुळे शहरातील सर्व भागातील गणेश
मंडळ पदाधिकाऱयांना मुख्‍य कार्यालयाकडे चकरा माराव्‍या लागत होत्या.
शहरातील सर्व गणेश मंडळाची सोय होण्‍याचे दृष्‍टीने महानगरपालिकेच्‍या
चारही क्षेत्रीय कार्यालयाच्‍या हद्दीमधील सार्वजनिक गणेश मंडळांना
संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत आवश्‍यक परवानगी किंवा नाहरकत
प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तशा सूचना आयुक्त दिवेगावकर यांनी दिल्या
आहेत.

तरी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्‍या गणेश मंडळाकरीता
आवश्‍यक त्‍या परवानगीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे संपर्क साधून
परवानगी घ्यावी, असे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे.

गणेशोत्‍सव काळात आपल्‍या भागात आवश्‍यक साफसफाई ठेवावी. उच्‍च
न्‍यायालयाच्‍या निर्देशाप्रमाणे बॅनर्सना बंदी घालण्‍यात आलेली आहे. तरी
कोणत्याही गणेश मंडळाने अनाधिकृतरित्‍या बॅनर लावून कायद्याचा भंग करु
नये. राज्‍य शासनाने देखील नुकतीच प्‍लास्‍टीक बंदी घोषित केलेली आहे.
तरी प्रतिबंधीत प्‍लास्‍टीक वस्‍तूंचा वापर टाळावा.
- कौस्तुभ दिवेगावकर, आयु्क्त, महानगरपालिका.

Web Title: no objection certificate available in regional office at latur