esakal | आता लहान नगरातही बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एंट्री’
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी केली जात आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इतर नगरातील नागरिकांना प्रवेश टाळला जात आहे.

आता लहान नगरातही बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एंट्री’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : येथील गावकऱ्यांना वारंवार सूचना दिल्यानंतरही त्याचे पालन होत नसल्यामुळे बसस्थानक परिसरातील रामनगर भागातील नागरिकांनी नवीन व्यक्‍तींना प्रवेशास मनाई केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी केली जात आहे. मात्र, त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. 

विशेष म्हणजे शहरातील गल्लीबोळांमधून नागरिकांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे इतर भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. समाजासाठी तसेच घरच्यांसाठी तरी घरांमध्ये बंदिस्त व्हा, असे कळकळीचे आवाहनदेखील केले जात आहे. मात्र, नागरिकांच्या आवाहनास प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. 

हेही वाचानिर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर

नागरिक घराबाहेर पडू नयेत यासाठी उपाययोजना
 
त्यामुळे शहरातील रामनगर भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रामराव बोंढारे, संजय चांदिवले, गोविंद बोंढारे, गजानंद बोंढारे, महेंद्र बायस, संघरत्न नरवाडे यांनी बुधवारी रामनगरमधील येणारे सर्व रस्ते बंद करून नवीन व्यक्‍तींना येथे येण्यास मनाई केली आहे. तसेच रामनगर भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच बाहेरील भागातील नागरिकांनी या भागात येऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्याचे रामनगर भागातील नागरिकांनी सांगितले.

हिंगोली येथील लाला लजपतराय नगरात प्रवेश बंद

हिंगोली : ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्यांचा प्रवेश बंद केला आहे. त्‍याच धर्तीवर लाला लजपतराय नगरात बुधवारी (ता. एक) मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून परजिल्ह्यांतील अनेक कुटुंब हिंगोली जिल्ह्यात अडकले आहेत. पोलिस प्रशासन रस्त्यावर फिरणाऱ्याला समजून सांगत आहेत. परंतु, कोणीच लक्षच देत नसल्याने लाला लजपतराय नगरातील नागरिकांनी चक्क मुख्य प्रवेशद्वारच बंद करून घेतले आहे. नगरात ना कुणाला प्रवेश, ना कुणाला बाहेर जाऊ दिले जाणार असा निर्णयच येथील नागरिकांनी घेतला आहे. नगरात जाणाऱ्या प्रवेशद्वारावर वेळूचे बांबू लावून प्रवेशबंदीचा फलक लावण्यात आला आहे.

कळमनुरीत स्‍वच्‍छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

कळमनुरी : येथे प्रत्‍येक प्रभागात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नियमित स्वच्छता केली जात असल्याने पालिका कर्मचाऱ्याच्या या कामाची दखल घेऊन पालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

येथे क्लिक करालॉकडाउनचा रेशीम उत्‍पादकांना फटका

कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार

पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छतेचे काम नियमितपणे चालविले आहे. बंद असतानाही स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहर स्वच्छतेसाठी घेतलेला पुढाकार पाहता स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे नियोजन पालिका पदाधिकाऱ्यांनी सुचविले होते. त्यानुषंगाने नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक अप्पाराव शिंदे, राजू संगेकर, ॲड. इलियास नाईक, दादाराव डुरे, अभियंता एन. पी. डाखोरे यांच्या उपस्थितीत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.