esakal | उस्मानाबादेत पावसाच्या मोजमापाची अचूकता येईना!
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

उस्मानाबादेत पावसाच्या मोजमापाची अचूकता येईना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील Rain In Osmanabad पावसाच्या मोजमापाची धुरा आता खासगी कंपनीच्या खांद्यावर गेली आहे. तर पावसाची असमान हजेरी लागत असताना त्याचे मोजमापही अचूक पद्धतीने होत नाही. यासाठी नव्याने काही पर्जन्यमापक यंत्र बसवून काही ठिकाणे बदलण्याची गरज आहे. जिल्ह्यात किती पाऊस झाला, यावरून शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यात राबविल्या जातात. गेली अनेक वर्षे पर्जन्यमापनाची Rain जबाबदारी शासनाची होती. मात्र, त्यामध्ये अचूकता येत नसल्याने आता खासगी कंपनीकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात स्कायमेट Skymate या कंपनीच्या माध्यमातून पावसाचे मोजमाप केले जात आहे. जिल्ह्यात ५७ महसूल मंडळ Revenue Circles आहेत. या मंडळांची रचना योग्य पद्धतीची नसल्याने यामध्ये अचूकता येतच नाही.no record of rain measuring in osmanabad glp 88

हेही वाचा: कोरोना लसीसाठी धावाधाव, तब्बल ५५ हजार जण प्रतिक्षेत

नव्या महसूल मंडळात पर्जन्यमापक नाही

जिल्ह्यात यापूर्वी ४२ महसूल मंडळ होते. यामध्ये शासनाने वाढ केली आहे. १५ नवीन महसूल मंडळांची निर्मिती झाली आहे. या नवीन ठिकाणी पर्जन्यमापक बसविले नाहीत. त्यामुळे तेथील पावसाचे मोजमाप होऊ शकत नाही. या वाढीव ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याची मागणी होत आहे. अनेक महसूल मंडळाची रचना ओबडधोबड आहे. त्यामुळे पावसाचे मोजमाप होत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील पर्जन्यमापकाची नोंद होते राघुचीवाडीतून

उस्मानाबाद Osmanabad शहर हे एक महसूल मंडळ आहे. यामध्ये राघुचीवाडी गावाचा समावेश आहे. हे गाव उस्मानाबाद शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. या महसूल मंडळाचे पर्जन्यमापक यंत्र राघुचीवाडी गावात आहे. म्हणजे राघुचीवाडीत पाऊस पडला तरच शहराच्या पावसाची नोंद होते. हा प्रकार अजब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने मोजमाप होत आहे. यात बदल करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचा: कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकार चळवळीला हरताळ; खोतांचा आरोप

वाऱ्याची दिशा, गती, आर्द्रता, तापमान या चार बाबीची माहिती प्रत्येक १० मिनिटाला सर्व्हरला होते. त्यातून माहिती कृषी विभागात जाते. जर शासनाने पर्जन्यमापकासाठी जागा उपलब्ध करून दिली तर कोणत्याही ठिकाणी पर्जन्यमापक बसवता येते. शासनाने जागा दिली तर यामध्ये बदल होऊ शकतो.

- गोविंद पवार, जिल्हा समन्वयक, स्कायमेट.

काही महसूल मंडळाची रचना आगळीवेगळी आहे. एक गाव एका टोकाला तर दुसरे गाव दुसऱ्या टोकाला आहे. यातून अचूकतेचा मुद्दा येतो. यामध्ये अंतर खूप मोठे आहे. यामध्ये बदल करता येतो का? ही बाब विचाराधीन आहे. त्यासाठी प्रयत्न होतील.

- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

loading image