esakal | कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकार चळवळीला हरताळ; खोतांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मी चालत राहिलो तरी वादळ निर्माण होते! : सदाभाऊ खोत

कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून सहकार चळवळीला हरताळ; खोतांचा आरोप

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : सहकार चळवळीच्या उद्देशाला कॉँग्रेस Congress Party, राष्ट्रवादी कॉंग्रेसने Nationalist Congress Party हरताळ फासला. या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी साखर कारखाने आपसात वाटून घेत या चळवळीचे श्राद्ध घातल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी केला. रयत क्रांती संघटनेच्या Rayat Kranti Sanghatana माध्यमातून राज्यभर शेतकऱ्यांशी संवाद सुरू आहे. जिल्ह्यात Nanded आत्महत्या केलेल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खोत यांनी बुधवारी (ता. १४) भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांना मालक बनविण्याची चांगली कल्पना होती. त्यातून साखर तसेच इतर कारखाने उभे राहिले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हे कारखाने आपसात वाटून घेतले आहेत. राज्यात ५५ सहकारी साखर कारखान्यांत २५ हजार कोटींचा घोळ आहे. त्यात जिल्हा सहकारी बँकांचेही हात गुंतले आहेत.congress, ncp destroyed cooperative movment, sadabhau khot allegation in nanded glp88

हेही वाचा: सुखद! पाच महिन्यानंतर महिलेला मिळाले चोरीला गेलेले मंगळसूत्र

सहकारी साखर कारखान्यांत सरकारचे बाराशे कोटी तर शेतकऱ्यांचे अडीच हजार कोटींच्या घरात भागभांडवल आहे. आता हे कारखाने दहा ते वीस कोटी रुपयांमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांची वाट लावली आहे. असे सर्व साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे व्हावेत, यासाठी भविष्यात रयत क्रांती संघटना आंदोलन करील, असा इशाराही खोत यांनी दिला.

loading image