esakal | आता वैद्यकीय अधिकारी, आरआरटी पथकामार्फत तपासणी, कुठे ते वाचा... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

हिंगोली जिल्‍ह्यात प्रवेश करणाऱ्यांची पथकामार्फत तपासणी करण्याचे नवे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता.चार) काढले आहेत. तर इतर जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

आता वैद्यकीय अधिकारी, आरआरटी पथकामार्फत तपासणी, कुठे ते वाचा... 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः लॉकडाउनच्या काळात शासन निर्देशानुसार नागरिकांना मूळ गावी जाण्याची कार्यपद्धती विहीत करण्यात आली असून परराज्यातून तसेच इतर जिल्‍ह्यांतून हिंगोली जिल्‍ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. अशा नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी (ता. चार) काढले आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरआरटी पथकामार्फत नागरिकांची तपासणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्यासाठी व त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये ‘कोरोना’चा जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याकरिता जिल्हा सीमाबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सीमा (ता. १७) मेपर्यंत बंद करण्यात येत आहेत.

हेही वाचा - Video : ४५ हजारांची हातभट्टी दारू नष्ट; महिलेवर गुन्हा : वाचा कुठे?

दैनंदिन तपासणी करण्याच्या सूचना 
तपासणीत ज्या व्‍यक्‍तींना इन्फुजा व ‘कोरोना’ विषाणूसदृश्य लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्‍तींना आयसोलेशन कक्षात ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. ज्‍यांना कोणतेही लक्षणे आढळले नाहीत अशांना गृह विलगीकरणात ठेवावे तसेच ज्यांना गृह विलगीकरणासाठी ठेवले आहे अशा व्यक्‍तींच्या घरावर गृह विलगीकरण स्‍टीकर लावावे, अशा व्यक्‍तींची आरआरटी पथकामार्फत दैनंदिन तपासणी करण्याच्या सूचना जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या. या बाबतच्या दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अप्पर जिल्‍हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - परभणी जिल्ह्याच्या सीमेवर ११ लाखाची रोकड जप्त

जिल्‍ह्यातील सीमा राहणार बंदच
जिल्ह्यातील नागरिक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यांतील नागरिकही हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यांतून येणारे नागरिक, प्रवासी यांच्यामार्फत कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 

उल्‍लंघन केल्यास कार्यवाही करणार
जिल्ह्यातील नागरिक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई व इतर महानगरांतून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्‍याचे उल्‍लंघन केल्यास अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. 

loading image
go to top