ऑनलाइन प्रणालीसाठी अधिकाऱ्यांची परीक्षा 

अभय कुळकजाईकर 
मंगळवार, 15 मे 2018

नांदेड -  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कामकाजासंदर्भात नवीन ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी (उपजिल्हाधिकारी) आणि सहायक मतदान नोंदणी अधिकारी (तहसीलदार) यांच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याअंतर्गत मराठवाड्यातील तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांची औरंगाबादला सोमवारी (ता.14) लेखी परीक्षा झाली. 

नांदेड -  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कामकाजासंदर्भात नवीन ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी (उपजिल्हाधिकारी) आणि सहायक मतदान नोंदणी अधिकारी (तहसीलदार) यांच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याअंतर्गत मराठवाड्यातील तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांची औरंगाबादला सोमवारी (ता.14) लेखी परीक्षा झाली. 

नवीन प्रणाली हाताळणारी सर्व यंत्रणा सक्षम व्हावी, यासाठी आयोगाने विविध स्तरांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. ही प्रणाली बुधवारपासून (ता. 16) कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी मागील महिन्यात राज्यातील निवडक अधिकारी, दोन तांत्रिक कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय "मास्टर ट्रेनर' म्हणून प्रशिक्षण दिले. त्यानंतर "यशदा'मध्ये प्रत्येक जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, त्या जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांतील एक मतदार नोंदणी अधिकारी, प्रत्येक जिल्ह्याच्या एका तांत्रिक अधिकाऱ्याला प्रशिक्षण देण्यात आले. आता जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यास अनुसरून प्रत्येक महसुली विभागातील सर्व जिल्ह्यांतील सर्व निवडणूक यंत्रणेला प्रशिक्षण द्यावे, तसा अहवाल देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिले होते. त्याचप्रमाणे निवडणूक यंत्रणा विशेषतः मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी पूर्ण प्रशिक्षित झालेले असावेत, अशी अपेक्षा आहे. 

आयोगाने आखलेल्या मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या मूल्यमापनाच्या कार्यक्रमानुसार औरंगाबादला आज सकाळी अकराला संबंधितांची परीक्षा घेण्यात आली. उपस्थित नसलेल्यांची मंगळवारी (ता. 15) परीक्षा घेण्याचे निर्देश आहेत. ही परीक्षा देणेही बंधनकारक असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आठ उपजिल्हाधिकारी, 16 तालुक्‍यांचे 16 तहसीलदार औरंगाबादला लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी दिली. 

यांनी पाहिले कामकाज 
मराठवाड्यातील नांदेडसह औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली तसेच नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील संबंधितांची लेखी परीक्षा झाली. परीक्षेचे समन्वय अधिकारी म्हणून प्रशांत शेळके तर कक्ष अधिकारी तुषार हिर्लेकर यांची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

Web Title: Officers Exam for Online System