esakal | धक्कादायक: परंडा तालूक्यात कोरोनाने उघडले खाते
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एका युवकाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी आलेल्या अहवालामध्ये या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यानी दिली आहे.

धक्कादायक: परंडा तालूक्यात कोरोनाने उघडले खाते

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

परंडा (जि.उस्मानाबाद) : परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एका युवकाला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी आलेल्या अहवालामध्ये या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यानी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ३८ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यातही आजच लॉकडाऊन शिथील करण्यात आले होते, मात्र एक रुग्ण आढळल्याने प्रशासकीय पातळीवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे.  

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यामध्ये सूरुवातीला दोन व तीन एप्रिल रोजी तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यातही उमरगा भागातीलच हे तिन्ही रुग्ण होते, जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सुदैवाने कोरोनाचा फैलाव झालेला नव्हता. शिवाय ते तीनही रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलेला नव्हता. त्यामुळे नागरीकही निर्धास्त झाले होते, आता मात्र जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून मागील महिनाभर कोरोनाच्या हाती न लागलेल्या परंडा तालुक्याने खाते उघडले आहे.

तालुक्यात कोरोनाने खाते उघडल्याने त्या भागामध्ये भितीचे वातावरण पसरले असून त्याचा चांगलाच धसका जिल्ह्यामध्येही घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे. मुबंई, पुणे येथे प्रवास केलेल्या परंडा तालूक्यातील सरणवाडी येथील तीस वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यानी दिली आहे. वाशी व नवी मुंबई येथे शेतातील कलिंगड व खरबुज विक्रीसाठी तो घेऊन जात होता.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याची विक्री करुन गावाकडे आलेल्या त्या युवकाला ताप येवू लागल्याने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मुंबईचा प्रवास असल्याने हॉस्पिटल प्रशासनाकडून त्याची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा संध्याकाळी स्वॅब घेण्यात आला, व स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. लातुर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या जिल्ह्यातील अहवालातील या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

त्याच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती घेण्याचे काम तातडीने सूरु करण्यात आल्याची माहिती डॉ. गलांडे यानी दिली आहे.  जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने शहरासह जिल्ह्यातील व्यवहार सोमवार (ता.११) पासून ठराविक काळात दुकाने उघडी ठेवून व्यवहार सुरळीत करण्यात आले होते. यामुळे बाजारापेठेत गर्दी वाढत चालली होती. यातच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image