परभणीत एकाचा मृत्यु, ५६ पॉझिटिव्ह 

गणेश पांडे 
Tuesday, 29 September 2020

परभणी जिल्ह्यात सोमवारी (ता.२८) एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर नव्याने ५६ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. 

परभणी ः जिल्ह्यात सोमवारी (ता.२८) एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला तर नव्याने ५६ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. 

जिल्ह्यात सोमवारी ८२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण पाच हजार २३४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी चार हजार ३९५ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आजघडीला एकूण ६१७ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि २२२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला. 

हेही वाचा - धक्कादायक, विजेचा शॉक लागून माय-लेकराचा मृत्यू 

पुन्हा खासगी रूग्णालयात रुग्णावर प्लाझ्मा थेरपी 
परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढीतून देण्यात आलेल्या प्लाझ्मामुळे एका खाजगी रुग्णालयातील कोरोणा बाधित रुग्णावर सोमवारी (ता.२८) प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मेट्रो रक्तपेढीत रक्तातील रक्तघटक त्यातही प्लाझ्मा वेगळे करणारी अँफेरेसिस मशीन कार्यान्वित झालेली आहे. कोरोनावर मात केलेल्या रक्तदात्यांचे रक्त घेऊन त्यातून प्लाझ्मा वेगळा केला जातो. अँटीबॉडीज असलेला हा प्लाझ्मा गंभीर कोरोना बाधित रुग्णांना दिला जातो. एका खाजगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णावर शनिवारी (ता.२६) प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. सोमवारी देखील खाजगी रुग्णालयातील अन्य एका कोरोना बाधित गंभीर रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात फिजिशियनची वानवा आहे. एका फिजिशियनवर सर्व भार आल्याचे समजते. प्लाजमा थेरेपी करण्यासाठी फिजिशियन यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे फिजिशियनची संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे. तरच गंभीर रुग्णांना प्लाजमा थेरपीचा लाभ मिळू शकतो. 

हेही वाचा - बायोगॅस प्लांटमधून दररोज चार टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

पूर्णेत बारा कोरोना बाधित आढळले 
पूर्णा ः तालुक्यात ७० संशयितांची रॅपिड ॲंटीजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली असून त्यात बारा जण कोरोना बाधित आढळले आहेत. ग्रामीण रुग्णालयांतर्गत १६ संशयितांची सोमवारी (ता.२८) रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यापैकी अकरा कोरोना बाधित आढळले. येथील अलंकार नगरमधील ६६ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला, आनंद नगर येथील ५३ वर्षीय महिला व ५५, ३६, ६० वर्षीय पुरुष, आदर्श कॉलनीतील ६७, १५, १३, २२, ४९ वर्षीय महिला बाधित आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागात ५४ संशयितांची रॅपिड ॲंटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात ताडकळस येथील २५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला. अशा प्रकारे तालुक्यात एकूण ७० संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात बारा जण कोरोना बाधित आढळले.

 

सोमवारी (ता.२८) रात्री आठ वाजेपर्यंतची आकडेवारी

 
परभणी जिल्हा 
एकूण पॉझिटिव्ह - पाच हजार २३४ 
आजचे पॉझिटिव्ह - ५६ 
आजचे मृत्यू - एक 
उपचार सुरु - ६१७ 
उपचार घेत घरी परतलेले - चार हजार ३९५ 
एकूण मृत्यू - २२२ 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies in Parbhani, 56 positive, Parbhani News