
सकाळपासून त्या बाळाची आई या बालिकेला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती. मात्र, दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-रडून थकून गेल्याचे निदर्शनास आले.
परळी वैजनाथ (बीड) : शहरातील नाथ चित्र मंदिरच्या रस्त्यावर एक बेवारस बालिका आढळून आली. ही बालिका बऱ्याच वेळापासून रस्त्याच्या कडेला रडत असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी बालिकेला पाहिले. तत्काळ या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात कळविण्यात आली. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येवून बालिकेला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : उमरगा : पाणी वापर संस्थेची प्रक्रिया आणखी कागदावरच ! मृद व जलसंधारण विभागाकडून मिळेनात पाणी परवाने
शहरातील नाथचित्र मंदिर रस्त्यावरील वैद्यनाथ गँस एजन्सीच्या परिसरात बुधवारी (ता.१६) बाराच्या सुमारास एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला रडताना दिसून आली. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी तिला पाहिले. उपस्थित नागरिकांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांनी बालिकेला बिस्किटे व पाणी दिले.
मराठवाड्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळपासून त्या बाळाची आई या बालिकेला रस्त्याच्या कडेला घेवून बसली होती. मात्र, दुपारच्या सुमारास हे बाळ रस्त्याच्या कडेला रडून-रडून थकून गेल्याचे निदर्शनास आले. बऱ्याच वेळ त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न करूनही ती न सापडल्यामुळे शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांनी तात्काळ पोलिस वाहन व सोबत हवालदार श्री. तोटेवाड, महिला पोलिस श्रीमती डोरले यांना पाठवून बाळाला ताब्यात घेतले आहे. बालिकेच्या आईचा शोध पोलिस घेत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले