तिने देहविक्रयसाठी दिला स्वतःचा फ्लॅट, नंतर.....

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • न्यायालयाने ठोठावली वर्षभराची शिक्षा
  • पाच वर्षांपूर्वी गजानन कॉलनीत प्रकार 
  • पोलिसांनी पाच वर्षांपूर्वी केली होती कारवाई

औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी देहव्यापार करण्यासाठी स्वत:चा फ्लॅट उपलब्ध करून दिल्याप्रकरणात एका महिलेला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दीड हजारांचा दंड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी ठोठावला. संगीता ऊर्फ सोनाली सूरज जाधव (वय 33) असे आरोपीचे नाव आहे. 

काय आहे प्रकरण 

तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना गजानन कॉलनीतील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये देहविक्रय व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी संगीता जाधव ही आर्थिक फायद्यासाठी स्वत:चा फ्लॅट देहव्यापार करण्यासाठी उपलब्ध देत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी खबऱ्याला 15 नोव्हेंबर 2014 ला दुपारी तीन वाजता आरोपीकडे पाठविले. सौदा होताच खबऱ्याने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी पीडित महिलेसह संगीताला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या घरातून 64 हजार रुपये आणि देहव्यापारासंबंधीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अनैतिक देहव्यापार वाहतूक प्रतिबंध कायदा,(पीटा) कलम 3,4 व 5 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

हेही वाचा -   मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण

सात साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे 

सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी आणि विशेष सहाय्यक सरकारी वकील एस. एल. दास-जोशी यांनी एकूण सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पुरावे व साक्षीवरून न्यायालयाने आरोपीला पीटा कायद्याच्या कलम 3 प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी व एक हजारांचा दंड, कलम सहा प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड ठोठाविला. पैरवी अधिकारी मोतीलाल सिंघल आणि सुनीता वाकोडे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले. 

हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..

जाणून घ्या : बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one year jail to woman for giving Home for Sex Racket