esakal | कोविडची फक्त लाट ओसरली, कोरोना संसर्ग आटोक्यात आलाच असे नाही
sakal

बोलून बातमी शोधा

कोविडची फक्त लाट ओसरली, कोरोना संसर्ग आटोक्यात आलाच असे नाही

इतरत्र रुग्ण वाढत असताना मराठवाड्यातील रुग्णसंख्या ओसरत आहे म्हणून नागरिकांनी निश्‍चिंत व्हावे अशी सध्या तरी स्थिती नाही. लातूर, बीडची रुग्णसंख्याही कमी अधिक होत आहे.

कोविडची फक्त लाट ओसरली, कोरोना संसर्ग आटोक्यात आलाच असे नाही

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : पश्‍चिम महाराष्ट्रासह Western Maharashtra नगरमध्ये कोरोनाचा Corona प्रकोप सुरूच आहे. मराठवाड्यातील Marathwada बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातही दररोज शंभरी पार रुग्ण बाधित होत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांसाठी हा सूचक इशाराच असून कोविडची फक्त लाट ओसरली, कोरोना संसर्ग आटोक्यात आलाच असे नाही. त्यामूळे अजूनही कोरोनाचा धोका असून सुरक्षित पावले टाकण्याची गरज आहे. त्यासाठी विभागीय स्तरावर चोख नियोजनाची गरज आहे. तसे झाल्यास मराठवाड्यातील निवळलेली स्थिती कायम राहू शकले. कोविड संसर्ग ओसरल्यानंतर आता थोडा दिलासा प्रत्येकजण अनुभवत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरीही काही जिल्ह्यांत खासकरून पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा फैलाव कायम आहे. तेथील मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही चिंताजनक आहे. इतरत्र रुग्ण वाढत असताना मराठवाड्यातील रुग्णसंख्या ओसरत आहे म्हणून नागरिकांनी निश्‍चिंत व्हावे अशी सध्या तरी स्थिती नाही. लातूर Latur, बीडची Beed रुग्णसंख्याही कमी अधिक होत आहे. औरंगाबाद Aurangabad, उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यांतही रोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.Only Covid Second Wave Slowed, Not Corona Infection

हेही वाचा: लालचंद ज्वेलर्सला गंडा, कारागिराने हडपले ४० लाखांचे सोने

नगर-औरंगाबाद वर्दळीचा धोका

नगर जिल्ह्यात आज ४३७ जण बाधित आढळले. अर्थात औरंगाबादेत (१२० रुग्ण) तुलनेत पावणेचारपट रुग्ण कमी आढळले आहेत. एकट्या नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यातील आजची रुग्णांची संख्या ५१२ एवढी आहे. नगर जिल्हाची सीमा औरंगाबाद, बीडला खेटून आहे. निर्बंध जवळपास शिथिल झाल्याने नगर-औरंगाबाद अशी वाहतूक सारखी सुरू असते. त्यामुळे संसर्गाला वाव मिळू शकतो, हे नागरिकांसह प्रशासनाने ध्यानात घ्यायला हवे.

हेही वाचा: मुलांनो! आई-बाबांसाठी घरी परता, एकटेपणा छळतोय त्यांना

अशी घ्या खबरदारी

- गरजेपुरते बाहेर पडा, मास्क वापरा

- गर्दी टाळा, सर्व नियम पाळा

- बीड, उस्मानाबाद, औरंगाबादेत रुग्ण कमी करण्याची जबाबदारी नागरिकांचीही

- प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरुच राहावे.

लोकांनी नियम पाळले नाहीत आणि रुग्णसंख्येची वाढ कायम राहिली, तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येईल. नागरिकांनी कोविडचे नियम पाळावेत, गर्दी टाळावी. शहर आणि ग्रामीण भागांत लोकांची गर्दी, घोळके कायम आढळत आहेत. म्हणूनच रुग्ण वाढत असल्याचे दिसते.

-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड.

loading image