साडेतीन हजार लोकांच्या गावात केवळ सात पदवीधर मतदार!  

हबीबखान पठाण
Tuesday, 1 December 2020

रांजणगाव (दांडगा) येथील पदवीधर निवडणुकीत स्पष्ट झाली स्थिती 

पाचोड (औरंगाबाद) : तब्बल साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात केवळ सात पदवीधर मतदार असल्याचे पाहून त्या गावातील शिक्षणाचे महत्व व गांभीर्य लक्षात येते. हे गाव आहे पैठण तालुक्यातील रांजणगाव (दांडगा). 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गावाची लोकसंख्या तीन हजार दोनशे साठ असून दोन-चार कुटूंब वगळता बहुतांश नागरिक एक दुसऱ्याचे नातेवाईक आहेत. सुशिक्षित वर्ग केवळ दहा टक्के आहे. पाचोड (ता. पैठण) च्या पोलीस ठाण्यात १९५७ पासून या गावाच्या भांडणाच्या अनेक नोंदी असून अनेक प्रकणात अनेकांना शिक्षा झाली, तर काही प्रकरणे न्यायालयात आजही प्रलंबीत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या गावातील प्रा. महमद उमर, प्रा. शेख इसाक व शेख इमाम हे तिघेजण नोकरीला आहेत. काही दिवसांपासून पदवीधर निवडणुकीत मतदार नोंदणी करण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात आली, मात्र, अनेक ठिकाणी मतदार नोंदणी झाली नसल्याचे दिसून येते ते या गावावरून दिसून येते. या अख्ख्या गावात फक्त सातच पदवीधर मतदार आहेत. येथे दोघांनीच हक्क बजावला. ते दोघेही पती-पत्नी आहेत. शकील साहेबलाल शेख आणि त्यांची पत्नी नौशाद शकील शेख असे त्यांचे नाव आहे. त्यांनी बालानगर मतदान केंद्रात दुपारी मतदान केले. तर दौलत मंचरे यांनी बिडकिन मतदान केंद्रावर मतदान केले तर अन्य तिघांनी औरंगाबाद येथे मतदान केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लवकरच गाव शंभर टक्के साक्षर करू 
यासंबंधी सरपंच रियाज शेख म्हणाले, की गावामध्ये जवळपास चाळीस जण पदवीधर असून त्यांना मतदानाचे फारसे गांभीर्य नसल्याने त्यांनी मतदान यादीत नाव नोंदणी केली नाही. आतापर्यंत ग्रामस्थ शिक्षणापासून दूर होते, परंतु आता त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागल्याने येणाऱ्या काळात गाव शंभर टक्के साक्षर होईल अशी अपेक्षा आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only seven graduate voters in village of three thousand five hundred people