धक्कादायक.! कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराला विरोध; गावकरी म्हटले स्वतंत्र स्मशानभूमी तयार करा..

प्रशांत बर्दापूरकर
Thursday, 23 July 2020

नेहमीच्या स्मशानभूमीत कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा, अशी मागणी गावकर्यांनी केली. मात्र या प्रकारामुळे माणूसकी हरविली की काय असा प्रश्न उभा झाला आहे.

अंबाजोगाई (बीड) : कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराला स्थानिकांनी विरोध केल्याने गुरुवारी (ता.२३) सायंकाळपर्यंत दोन मृतांवर अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते. नेहमीच्या स्मशानभूमीत कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा, अशी मागणी गावकर्यांनी केली. मात्र या प्रकारामुळे माणूसकी हरविली की काय असा प्रश्न उभा झाला आहे.  

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

स्वारातीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना मृत्यूमुखी पडलेल्या दोन कोरोना बाधीतांवर शहरातील बोरुळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पालिका व महसूल प्रशासनाने स्वारातीच्या परिसरात असलेल्या जागेत अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

परंतू तेथेही विरोध झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पालिकेच्या कचरा डेपो परिसरात शेड तयार करून अंत्यविधी करण्याचे ठरले. परंतू सायंकाळपर्यंत हा अंत्यविधी झाला नव्हता.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

अंबाजोगाईत गुरुवारी सात कोरोनाबाधीत रुग्णाचे निदान झाले. त्यापैकी हाऊसिंग सोसायटी येथील एका ९० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर आणखी एक इतर ठिकाणच्या कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला होता. त्या दोघांवर आता अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposse funeral of corona dead person