esakal | रब्बी पिकांसह फळबागांना अवकाळीचा फटका 
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

जिल्‍हाभरात सोमवारी (ता.३०) रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, संत्रा, आंबा व केळी, हळदीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील पंधरवाड्यात तिसऱ्यांना वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला आहे. 

रब्बी पिकांसह फळबागांना अवकाळीचा फटका 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍हाभरात सोमवारी (ता.३०) रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला, संत्रा, आंबा व केळी, हळदीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली शहरातील वीज पुरवठाही काही वेळ खंडीत झाला होता. पंधरवाड्यात तिसऱ्यांदा पाऊस झाला असून अनेक ठिकाणी गारपीटीने पिके भूईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. 

सोमवारी झालेला पाऊस हिंगोली शहरासह तालुक्‍यातील नरसी नामेदव, पहेणी, सवड, कनेरगाव, फाळेगाव, खांबाळा, भांडेगाव, साटंबा, बोराळा, नांदूरा, पांगरी, बासंबा, सिरसम, अंधारवाडी, कोथळज, कारवाडी, सावरखेडा आदी ठिकाणी झाला आहे. कळमनुरी तालुक्‍यात शहरासह डोंगरकडा, जवळा पांचाळ, वारंगाफाटा, तोंडापूर, चुंचा, सुकळीवीर, जामगव्हाण, बोथी, शेवाळा, बाळापूर, पोतरा, बोल्‍डा, असोला, येहळेगाव, नांदापूर आदी गावात पाऊस झाला.

हेही वाचाहिंगोलीकरांना घरपोच मिळणार भाजीपाला

भाजी पाल्याचे नुकसान

तसेच वसमत तालुक्‍यातील गिरगाव, परजना, पार्डी, सोमठाणा, किन्होळा, कुरुंदा, कोठारी, पांगरा, वापटी, खांबाळा, सिरळी, खापरखेडा, हयातनगर, हट्टा, आरळ, करंजाळा, बोरी, गुंडा आदी ठिकाणी पाऊस झाला. औंढा नागनाथ तालुक्‍यातील औंढा शहरासह, गोळेगाव, साळणा, गोजेगाव, येळी, केळी, जवळा बाजार; तर सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव, केंद्रा बुद्रुक, बटवाडी, कहाकर बुद्रुक आदी भागात पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपासून अधून-मधून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागांसह, भाजी पाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अवकाळी पावसाचे संकट

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला जात आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. तोच पुन्हा अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यावर कोसळले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन केले आहे.

मजूर मिळत नसल्याचे चित्र

त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीस आलेली पिके काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांना घराबाहेर जाता येत नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री झालेल्या पावसासह वादळी वाऱ्याने शहरातील अकोला बायपास भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

येथे क्लिक करागरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

गारपीटीने फळबागांचे नुकसान

मागील पंधरवाड्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. सध्या संत्रा, आंबे, टरबूज आदी फळबागा पक्व झाल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारीही फळबागाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिपक्व होवूनही फळबागांची तोडणी करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.  त्यात गारपीट झाल्याने फळबागांचे नुकसान होत आहे.