esakal | उस्मानाबाद : ३८ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या पोचली १४ वर 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

का ३८ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. 

उस्मानाबाद : ३८ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू, बळींची संख्या पोचली १४ वर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ३८ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

हा रुग्ण २९ जून रोजी परंडा येथील रुग्णालयामध्ये दाखल झालेला होता. आसु या गावाचा रहिवाशी असलेला हा युवक बार्शी (जि. सोलापुर) येथे पॉझीटिव्ह आढळलेला होता. तेथून त्याना परंडा येथील रुग्णालय व नंतर प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याने जिल्ह्यातील मृत्युसंख्या १४ वर पोहचली आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

शनिवारी उमरगा येथील मयत झालेल्या रुग्णाचाही अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकाचा मृत्यु झाला आहे. साहजिकच जिल्ह्यातील मृत्यु होणाऱ्याचे प्रमाण आता वाढत असल्याचे चित्र आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

शनिवारी (ता. चार ) रोजी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातुन १५७ नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला आहे. त्यापैकी दोन पॉझिटीव्ह १३८ निगेटिव्ह, १७ जणाचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. त्याचे अहवाल दुपारपर्यंत येणार आहेत. तर (ता. तीन) रोजी पाठवलेल्या स्वॅबपैकी २३ अहवाल अजूनही प्रलंबित होते. शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात नऊ जणाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

उस्मानाबाद जिल्ह्यतील परंतु बाहेर जिल्ह्यात पॉझिटिव्ह येऊन तेथेच उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद येथील असून तो पुणे येथे उपचार घेत असून दुसरा रुग्ण (गिरवली ता. भूम) येथील आहे. त्यामुळे शनिवारी जिल्यात१३ रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. त्यातही एकट्या परंडा तालुक्यातील रुग्णाची संख्या आठ असून त्यापैकी चार रुग्ण परांडा शहरातील तर तीन रुग्ण नालगाव व एक रुग्ण आवाड पिंपरी येथील आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

सध्याच्या स्थितीला जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २६८ वर पोहचली आहे. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यु झालेला आहे. तर १८६ जणांना कोरोनामुक्त करुन घरी सोडण्यात आले आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक  

सध्या ६८ रुग्णावर उपचार सूरु आहेत. उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात २२, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे २२, तर उमरगा येथील विजय क्लिनिक येथे पाच तर तेथीलच शेंडगे हॉस्पिटलमध्ये एक रुग्णावर उपचार सूरु आहेत. तर कोरोना केअर सेंटर कळंब येथे दहा याशिवाय लातूर येथील शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात जिल्ह्यातील तीन रुग्ण, पुण्यामध्ये एक सोलापूरमध्ये तीन तर बार्शीमध्ये एक 
असे एकूण ६८ रुग्णावर सध्या उपचार सूरु आहेत.