esakal | दिलासादायक : उस्मानाबादेत आज कोरोनामुळे मृत्यू नाही, वाढले १५८ पॉझिटिव्ह. 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus.png

उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ल्यात काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. 

दिलासादायक : उस्मानाबादेत आज कोरोनामुळे मृत्यू नाही, वाढले १५८ पॉझिटिव्ह. 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये १५८ नवीन रुग्णांची भर पडली असुन १९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाही मृत्युची नोंद नसल्याने निश्चितपणाने काहीसा दिलासा देणारी बाब समोर आली आहे. बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के इतके झाले असुन मृत्यू दर ३.१० टक्क्यावर पोहचला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ६० हजार ७४३ नागरीकांची तपासणी करण्यात आली असुन त्यातुन १२ हजार ४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.साधारण २०.५२ टक्के इतक्या प्रमाणात नागरीकांना कोरोनाची लागन झाल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्यात सात हजार ८९६ एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर एक हजार १२६ इतके रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


जिल्ह्यामध्ये आलेल्या १५८ रुग्णामध्ये १८ जण आरटीपीसीआरद्वारे तर १३१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यातही उस्मानाबाद तालुक्यामध्ये बाधितांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसुन येत आहे. ६९ पैकी ६७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर दोन जणांना इतर जिल्ह्यामध्ये लागन झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उमरगा १७ जणांना लागन झाली असुन सहा जण आरटीपीसीआरद्वारे तर दहा जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब मध्ये २० जण बाधित झाले असुन तीन जण आरटीपीसीआरद्वारे व १७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.वाशीमध्ये १५ जणांना लागन झाली त्यात सात जण आरटीपीसीआरद्वारे तर सात जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भुममध्ये १४ जणांना लागन झाली असुन त्यामध्ये सर्वजण अँटिजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. परंड्यात ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असुन त्यामध्ये दोन जण आरटीपीसीआरद्वारे व पाच जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर चार जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. तुळजापुर चार, लोहारा आठ अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image