Corona : उस्मानाबादेत आज ६० रुग्ण वाढले, बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर

तानाजी जाधवर
Thursday, 22 October 2020

गुरूवारी जिल्ह्यामध्ये आढळलेल्या ६० रुग्णांपैकी १३ जण आरटीपीसीआरद्वारे तर ४१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरूवारी दिवसभरामध्ये ६० कोरोनाबाधितांची भऱ पडली आहे. सुदैवाने जिल्ह्यात दिवसभरामध्ये मृत्यूची नोंद नाही. तर दिवसभरात ७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १२ हजार ७०४ रुग्ण बरे झालेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३० टक्के एवढे झाले आहे. कोरोना होण्याचे प्रमाण १८.९६ टक्के असून ७४ हजार १९२ प्रयोगशाळा नमुन्यापैकी १४ हजार ६०९ लोकांना कोरोनाची लागन झाल्याची नोंद आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गुरूवारी जिल्ह्यामध्ये आढळलेल्या ६० रुग्णांपैकी १३ जण आरटीपीसीआरद्वारे तर ४१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. १३९ जणांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ६०६ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४१ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उस्मानाबाद १५, तुळजापुर सात, उमरगा १६, लोहारा एक, कळंब आठ, वाशी चार, भुम तीन व परंडा सहा अशी तालूकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 उस्मानाबाद कोरोना मीटर 

एकुण रुग्णसंख्या - १४०६९
बरे झालेले रुग्ण - १२७०४ 
उपचाराखालील रुग्ण - ९०२ 
एकूण मृत्यू - ४६३ 
आजचे बाधित - ६० 
आजचे मृत्यु - निरंक 
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad corona update news