esakal | Corona update : उस्मानाबादेत ५४ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू ; बळींची संख्या पाचवर 
sakal

बोलून बातमी शोधा

corona image.jpg

उस्मानाबाद शहरातील एका ५४ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. शहरातील हा दुसरा तर जिल्ह्यातील पाचवा मृत्यु झाला आहे. १६ दिवसांपासून तो कोरोनाशी लढत होता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

Corona update : उस्मानाबादेत ५४ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू ; बळींची संख्या पाचवर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एका ५४ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. शहरातील हा दुसरा तर जिल्ह्यातील पाचवा मृत्यु झाला आहे. १६ दिवसांपासून तो कोरोनाशी लढत होता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या रुग्णास ह्रदयविकारासह, मधुमेह व अतितणावाच्या व्याधीने ग्रासलेले होते. त्यामुळे तो उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे सांगण्यात आले. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

जिल्ह्यामध्ये सात हजार ५५३ इतक्या संशयितांची संख्या असुन त्यातील सात हजार ५२९ लोक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. सहा हजार ४७९ होम तर एक हजार ५० लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत पाच हजार १३१ जणांनी चौदा दिवसाचा क्वारंटाईन काळ पुर्ण केला आहे. त्यातही १६५८ लोकांना घरी पाठविण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसुन येते. तरी मृत्युची संख्या आता पाचवर गेली आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
जिल्ह्यामध्ये शनिवारपर्यंत दोन हजार दोनशे दोन स्वॅब घेण्यात आले असुन त्यातील १४५ पॉझीटिव्ह आले होते. त्यातुन बरे झालेल्या लोकांची संख्या १०४ आहे. आतापर्यंत एकट्या उस्मानाबाद शहरात ५६ रुग्ण सापडले आहेत. तर इतर ठिकाणीही त्याचा फैलाव वाढला आहे पण आता शहरातील दुसर्‍या रुग्णाचा बळी गेल्याने चिंता वाढली आहे. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

लातुरमध्ये सापडलेल्या गर्भवती महिलेच्या संपर्कात अनेक सार्वजनिक ठिकाणचे लोक आले होते मात्र त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहिप्रमाणात दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी जवळपास दोन हजार अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यामध्ये १४५ पैकी पाच बाधित रुग्ण हे परजिल्ह्यामध्ये बाधित झाले असले तरी त्यांचा समावेश जिल्ह्याच्या आकडेवारीमध्ये करण्यात आला आहे.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

शिवाय जिल्ह्यात पाच जण कोरोनाने मयत झाले. चार मृत्यु उस्मानाबादमध्ये झाला असुन एक जण उमरगा येथे दगावला होता. उस्मानाबाद तालुक्यातील तीन, कळंब तालुक्यातील एक व उमरगा तालुक्यातील एक अशा पाच जणाचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यु झालेला आहे.

loading image