
सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यामध्ये ६७ जण सापडले आहे. उमरगा येथे ३२, वाशी नऊ, तुळजापुर १६, कळंब तीन, परंडा दोन, भुम दोन, लोहारा एक अशा १३२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९९१ झाली आहेत.
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये १३३ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा तिन आकडी रुग्णसंख्या आल्याने आता चिंता व्यक्त होत आहे. सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुक्यामध्ये ६७ जण सापडले आहे. उमरगा येथे ३२, वाशी नऊ, तुळजापुर १६, कळंब तीन, परंडा दोन, भुम दोन, लोहारा एक अशा १३२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९९१ झाली आहेत.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
जिल्ह्यातील ४६६ अहवाल पाठविण्यात आले होते. त्यातील ४५२ अहवाल प्राप्त झाले असुन १४ लोकांचे अहवाल अजुनही प्रलंबित आहेत. उस्मानाबाद शहरातील काकडे प्लॉट, राम नगर, प्रसाद कॉलनी, समर्थ नगर, लहुजी नगर, सावरकर चौक, वैराग रोड, राजीव गांधी नगर, जिल्हा मध्यवर्ती, सांजा चौक, गणेश नगर, माणिक चौक, देशपांडे स्टँड, जुना बस डेपो, खाजा नगर, मारवाडी गल्ली, गालिब नगर, आनंद नगर, जिल्हा रुग्णालय निवासस्थान, मध्यवर्ती कारागृह, आदी शहराच्या महत्वाच्या भागामध्येही आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसुन येत आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
या शिवाय तालुक्यातील शिंगोली, येडशी, वडगाव (सि),ढोकी, सारोळा (बु), घाटंग्री, जुनोनी, कोळेवाडी, उपळा, गावसुद, रुईभर या गावामध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. उमरगा तालुक्यामध्येही ३२ रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९९१ झाली असुन बरे झालेले रुग्ण ४८२ तर उपचार घेत असलेले रुग्ण ४६१ झाली आहे. मृत्यु झालेल्या लोकांची संख्या ४८ इतकी झाली आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
Edited By Pratap Awachar