Corona Update : उस्मानाबादेत १८२ रुग्णांची वाढ, पंधराशे बाधितांवर उपचार सुरु

तानाजी जाधवर
Friday, 14 August 2020

आतापर्यंत रुग्णसंख्या - ३२२९ 
बरे झालेले रुग्ण - १६२८
उपचार सूरु रुग्णसंख्या - १५०७ 

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर मधुन ११३ जण पॉझिटिव्ह तर ६९ जणांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. बाधितांमध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये ४५, तुळजापुर २७, उमरगा २१, कळंब २४, परंडा ३४, भुम १८, वाशी १० व लोहारा ३ अशाप्रकारे रुग्णसंख्या आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

उस्मानाबाद शहरातील शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय एक, आनंद नगर एक, समर्थ नगर, विजय नगर, निंबाळकर गल्ली, तांबरी विभाग, नागनाथ रोड शेरखाने गल्ली, गणेश नगर, शिक्षक कॉलनी रईस गल्ली, बाबा ट्रान्सपोर्ट, शाहुनगर, जिजाऊ नगर तर तालुक्यातील रुई, तेर, काजळा,आळणी केकस्थळवाडी, पाटोदा, येडशी आदी भागामध्ये नवीन रुग्ण सापडले आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

तुळजापुर येथील समर्थ नगर, मंगळवार पेठ, उपजिल्हा रुग्णालय, लातुर रोड परिसरासह तालुक्यामध्ये अणदुर, सलगरा, इटकुर, नळदुर्ग, चिकुंद्रा, तोरंबा, शहापुर, भवानी, अपसिंगा या गावामध्ये रुग्ण सापडले आहेत. गांधी चौक, हनुमान चौक, गौतम नगर,सानेगूरुजी नगर, सोनार गल्ली तर तालुक्यामध्ये तुरोरी, मुरुम , सुपतगाव, तलमोड आदी भागामध्ये रुग्ण आढळले आहेत. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

कळंब शहरामध्ये गांधीनगर, बाबानगर, गणेश नगर, उपजिल्हा रुग्णालय, कसबा पेठ, लोणार गल्ली, कल्पना नगर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यासह तालुक्यामध्ये सात्रा, डिकसळ,ताडगाव, येरमाळा आदी भागामध्ये नविन रुग्ण सापडले आहेत. परंडा येथे मंगळवार पेठ, शिक्षक सोसायटी, कुर्डुवाडी रोड, मोमीन गल्ली, भीम नगर, पंचायत समिती तालुक्यामध्ये डोंजा, शिरसाव, शेळगाव, कात्राबाद, आलेश्वर, पांढरेवाडी आदी भागामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

भुम येथील मेन रोड परिसर, ग्रामीण रुग्णालय,समर्थ नगर, गांधी चौक तालुक्यातील जांब, चिंचपुर आदी गावामध्ये रुग्ण सापडले आहेत.वाशी मध्ये तांदुळवाडी रोड परिसर, कडकनाथवाडी, बावी चौक सह भागामध्ये रुग्ण सापडले आहेत. तर लोहारामध्ये एक रुग्ण सापडला आहे. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

आतापर्यंत रुग्णसंख्या - ३२२९ 
बरे झालेले रुग्ण - १६२८
उपचार सूरु रुग्णसंख्या - १५०७ 

Edited By Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Corona Update today 182 new positive