उस्मानाबाद : चोवीस तासात आठ जणांचा मृत्यू, दिवसभरात वाढले २२६ रुग्ण

सयाजी शेळके
Tuesday, 15 September 2020

उस्मानाबाद तालुक्यात ८३ पॉझिटीव्ह जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यात तब्बल ८३ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ६० जणांचे अहवाल रॅपीड अंटीजेन पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय तुळजापूर ५०, कळंब २७, उमरगा १७, लोहारा १३, भूम २९, परंडा पाच तर वाशीमध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.१५) तब्बल २२६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या चाेवीस तासात आठ जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातून २०६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी सर्वच अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ९७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

५६ निगेटीव्ह आले असून ५३ इन्कनक्लुझिव्ह आले आहेत. तर ५१० जणांची रॅपीड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ११६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर ३९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीतांची संख्या आठ हजार ९५८ वर पोहचली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उस्मानाबाद तालुक्यात ८३ पॉझिटीव्ह जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यात तब्बल ८३ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ६० जणांचे अहवाल रॅपीड अंटीजेन पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय तुळजापूर ५०, कळंब २७, उमरगा १७, लोहारा १३, भूम २९, परंडा पाच तर वाशीमध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आठ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात मंगळवारी आठ जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. दरम्यान मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे चारजण हे उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात २६१ जणांचा मृत्यू झाला असून सहा हजार ६४१ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Corona Update today 226 new positive and Eight death