esakal | Corona Update : उस्मानाबाद जिल्ह्यात आज ४६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १,६२० वर 
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

 जिल्ह्यात मंगळवारी (ता. चार) ४६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये तुळजापूर तालुक्यातून सर्वाधिक १८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिड हजाराच्या पुढे गेली आहे.

Corona Update : उस्मानाबाद जिल्ह्यात आज ४६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १,६२० वर 

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता. चार) ४६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये तुळजापूर तालुक्यातून सर्वाधिक १८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिड हजाराच्या पुढे गेली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील स्वॅब घेण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. दरम्यान सोमवारी (ता. तीन) जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात तसेच उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसराच्या प्रयोगशाळेत १७७ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४६ स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात १२, तुळजापूर तालुका १८,  उमरगा १४ तर भूम तालुक्यात एकाचा अँटीजन टेस्टद्वारे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

उस्मानाबाद शहर :  गालीबनगर, शंकरनगर, गणेशनगर आणि सांजा रोड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर इंगळे गल्लीतील तिघांचा समावेश आहे. तर उर्वरीत वडगाव (सि), गडदेवधरी, येडशी आणि तेर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका 

उमरगा तालुक्यात :  १४ पैकी १० रुग्ण शहरातील आहेत. यामध्ये गणेशनगर, पोस्टेज रोड, पतंगे रोड येथील प्रत्येकी एक तर कुंभार भट्टी येथील पाच, गौतमनगरच्या तिघांचा समावेश आहे. याशिवाय माडज, तुरोरी आणि मुरुम येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

तुळजापूर तालुका : १८ पैकी सातजण शहरातील आहेत. यामध्ये रोहिदास गल्ली, एस. टी. कॉलनी, उपजिल्हा रुग्णालय येथील प्रत्येकी एक तर जिजामातानगर दोन आणि अन्य दोन अशा एकूण सातजणांचा समावेश आहे. दरम्यान अणदूर येथील सात जणांचा समावेश असून कसईचे तिघे बाधीत आहेत. दरम्यान भूम तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण रुग्णसंख्या एक हजार ६२० वर पोहचली आहे. या शिवाय उपचार घेऊन घरी गेलेल्यांची संख्या ५२२ असून सध्या एकूण एक हजार ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

संपादन-प्रताप अवचार