esakal | उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

kaustabh divegaonkar.jpg

उस्मानाबाद शेजारील लातूर जिल्ह्यातील माझे मूळगाव. मी येथील भूमीपुत्र आहे. उस्मानाबादच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, अशी भावना उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी `सकाळ` शी बोलताना व्यक्त केली.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती 

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी पदी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली नियुक्ती झाली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात गुरुवारी (ता.२०) आदेश काढले आहेत. पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी यापूर्वी लातूर येथे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. याशिवाय जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामाचा अनुभव आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

त्यांचे शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालयातून झाले असून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मराठी विषयामध्ये झालेले आहे. त्यांचे मूळगाव लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे मात्र कोणती जबाबदारी दिली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. गेल्या अनेक वर्षांच्या खंडानंतर जिल्ह्याला याच परिसरातील जिल्हाधिकारी मिळाले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे सावट आहे. ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याचे मोठे आवाहन त्यांच्यावर असणार आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

दररोज तीन वाजेपर्यंतच जिल्ह्यात कामकाज सुरू असते. हा निर्णय बदलण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र तत्कालिन जिल्हाधिकारी मुधोळ-मुंढे यांनी याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे लोकांकडून नाराजी होती. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी दैनंदिन कामकाज तीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात होता. मात्र त्यानंतर शिथिलता आल्याने संसर्ग वाढला. दरम्यान मृत्यूदरही वाढल्याने आरोग्यमंत्र्यांनी यावर ताशेरे ओढले होते. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

आता नवीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आघाड्यावर काम करावे लागणार आहे. बळीराजा चेतना अभियानातील पुस्तक घोटाळा आणि दलित वस्ती घोटाळा यावर कारवाईत ते लक्ष घालतील का याकडे लक्ष लागले आहे. उस्मानाबाद शेजारील लातूर जिल्ह्यातील माझे मूळगाव असून येथील भूमीपुत्र आहे. उस्मानाबादच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, अशी भावना त्यांनी `सकाळ` शी बोलताना व्यक्त केली आहे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top