उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाला मिळाले अवघ्या चोवीस तासात 'हाय-फ्लो ऑक्सिजन' मशीन 

Osamanabad.jpg
Osamanabad.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील चिंताजनक झाले आहे. यावर शासकीय यंत्रणाकडून व आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करून नियंत्रण केले जात आहे.

तर दुसरीकडे गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त पडणाऱ्या हाय फ्लोऑक्सिजन मशीनची कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे सोलापूर येथील उद्योजक श्री. डी. राम. रेड्डी यांनी सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या चोवीस तासात दोन हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशिन रुग्णालयाकडे सुपुर्द केली. अतिगंभीर रुग्णांवर उपचार करताना या मशीनचा मोठा फायदा होणार असून कोरोना मृत्यूवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!
उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि होणारे मृत्यू यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बालाजी अमाईन्सकडे हाय-फ्लो ऑक्सिजन मशिनची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीस प्रतिसाद देत बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत दोन मशिन्स रुग्णालयास उपलब्ध करून दिल्या. कोरोनाचे गंभीर रुग्ण ज्यांना श्वसनासंबंधी त्रास होत आहे. त्यांच्यासाठी हे उपकरण खूप सहाय्यक ठरणार असल्याचे डॉ. सतीश सुरवसे यांनी सांगितले.

यावेळी बालाजी अमाईन्सचे प्रतिनिधी मारुती सावंत व विनोद चुंगे यांनी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सतीश सुरवसे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन बोडके,  सतीश पवार यांच्याकडे हे उपकरण सुपूर्द केले.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मशीन्स एकही उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी या मशीनच्या संदर्भात विचारणा केली. माझ्याकडे दोन मशीन उपलब्ध होत्या. त्या इतरत्र दिल्या जाणार होत्या. डॉक्टरांनी परिस्थिती सांगितल्यानंतर त्या दोन्ही मशीन मी उस्मानाबादसाठी दिल्या आहेत. यातून जिल्ह्यातला मृत्यूदर कमी होईल अशी अपेक्षा आहे. 
डी. राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाइन्स 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com