esakal | कांद्याचे भाव कोसळले, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

Onions Price Come Down Paranda

काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत होते. चांगल्या कांद्याला दोन ते तीन हजार रुपयांचा प्रतिक्विंटल भाव होता.

कांद्याचे भाव कोसळले, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

sakal_logo
By
आनंद खर्डेकर

परंडा (जि. उस्मानाबाद) : राज्य शासनाने बाजारपेठेसाठी कडक निर्बंध घातले. त्याचा परिणाम शेतमालावरही झाला आहे. आठवडे बाजारबंद असल्याने कांद्याचे भाव कमालीची घसरले असून, सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत होते. चांगल्या कांद्याला दोन ते तीन हजार रुपयांचा प्रतिक्विंटल भाव होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत घेऊन येत होते.

कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात

मात्र, कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागल्याने राज्य शासनाने नियम कडक करीत ठरावीक अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर बंधने आली. आठवडे बाजारही बंद आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव झपाट्याने खाली आले. कांद्याला ५०० रुपये ते एक हजार रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. त्यासाठी लागणाऱ्या बारदाण्याचे भाव मात्र शेकडा ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. 

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  

इतर पिकांनाही फटका 
उन्हाळ्यात चांगला भाव मिळेल या आशेवर अनेकांनी काकडीचे उत्पादन घेतले. मात्र, ठोक बाजारात काकडीचा भाव किलोला सात ते आठ रुपये असल्याने उत्पादन खर्चही पदरात पडत नाही. अशीच अवस्था खरबूज, टरबुजाची झाली आहे. या परिसरातील अनेक गावातील भाजीपाला विक्रीसाठी, पुणे, वाशी नवी मुंबई येथील बाजारपेठेत रोज जातो. यासाठी माल वाहतूक करणारी अनेक वाहने आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठ सुरू असल्याची खात्री असल्याशिवाय वाहने शहरात जात नाहीत. यातच इंधनाचे, दर वाढल्याने वाहतुकीचे भाडे वाढले आहे. दोन दिवसांपेक्षा जास्त न टिकणाऱ्या नाशवंत भाजी, फळांना कोरोनामुळे करण्यात येणाऱ्या नियमांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

संपादन - गणेश पिटेकर

loading image