Corona Update: उस्मानाबाद जिल्ह्यात वाढताहेत रुग्ण

सध्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरू ठेवतात येतात. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाउन आहे
Osmanabad
OsmanabadOsmanabad

उस्मानाबाद: कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. पण, धोका अजून कायम आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात तीन दिवसांपासून रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून निर्बंध हटविण्याची तयारी दिसत नसल्याचे चित्र आहे. व्यापारी व नागरिकांकडून जरी निर्बंध हटविण्याची मागणी होत असली तरी सद्यःस्थितीला जोखीम स्वीकारण्यास जिल्हा प्रशासन तयार दिसत नाही. शासनाकडून २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे संकेत मिळाले. पण, जिल्हा प्रशासनाला त्या बाबत अधिकार दिले आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरू ठेवतात येतात. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाउन आहे. परंतु, मधल्या काळात पन्नास ते ७० असणारी रुग्णसंख्या तीन दिवसांपासून शंभराच्या जवळपास पोचली. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. अशा काळात प्रशासनही सावध भूमिका घेत असून, एकदम दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्याऐवजी काही दिवसांची प्रतीक्षा करूनच आदेश येतील, अशी शक्यता दिसत आहे.

Osmanabad
शैक्षणिक पात्रता एकच; वेतन मात्र वेगवेगळे

चारपर्यंतची वेळ काही तासाने वाढवून व्यावसायिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. सोमवारीच यावर निर्णय होईल; अन्यथा पुढे आठवडाभर आहे त्याच वेळेमध्ये व्यवहार सुरू ठेवून त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे. चारपर्यंतची आता सायंकाळी सातपर्यंत केली तर फारसा फरक पडणार नाही, असे मत व्यापाऱ्यांन व्यक्त होत आहे. सकाळी दहा ते साडेदहानंतरच बाजारात काहीशी गर्दी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना साधारण पाच ते सहाच तास व्यवहारासाठी मिळत असल्याची ओरड होत आहे. याचा थेट परिणाम व्यवसायावर होत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Osmanabad
ग्रामीण भागाला दिलासा! आता मिळणार सीटी स्कॅन, MRI, डायलिसीस सुविधा

सलग दोन दिवस रुग्णांची शंभरी
सद्यःस्थितीला महिना ते दीड महिन्यांपासून रुग्णसंख्या जेमतेम शंभराच्या खालीच असल्याने आता व्यापार पूर्ववत करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, असा विचार करत असतानाच सलग दोन दिवस शंभर व १०२ अशी रुग्ण आढळल्याने पुन्हा प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन निर्बंध हटविण्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार याकडे व्यापाऱ्यासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com