उस्मानाबाद कोरोना : आज 32 रुग्णांची वाढ, 20 जण झाले बरे! 

तानाजी जाधवर
Monday, 23 November 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात 32 रुग्णाची वाढ झाली असून 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये एकही मृत्यू झालेला नाही, असे असले तरी मृत्यूचा दर अजूनही साडेतीन टक्क्याच्या पुढे आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात 32 रुग्णाची वाढ झाली असून 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये एकही मृत्यू झालेला नाही, असे असले तरी मृत्यूचा दर अजूनही साडेतीन टक्क्याच्या पुढे आहे.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

आतापर्यंत जिल्ह्यातील 14 हजार 693 इतक्या कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी सुरक्षित पाठविले आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.40 टक्के एवढे झाले आहे. जिल्ह्यामध्ये सापडलेल्या 32 जणापैकी पाच जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. 180 जणाचे स्वॅब चाचणी घेण्यात आली होती, त्यातील 15 रुग्णांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. तसेच 249 जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली त्यातील 12 जणाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यातील उस्मानाबाद 12, कळंब सहा, वाशी पाच, भुम चार, लोहारा तीन, परंडा व उमरगा प्रत्येकी एक जण अशी तालुकानिहाय सापडलेल्या रुग्णांची संख्या आहे. तसेच तुळजापुर येथे मात्र एकही रुग्ण सापडलेला नाही. आजपर्यंत जिल्ह्यातील 94 हजार 428 इतक्या संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 15 हजार 565 जणांना कोरोनाची लागन झाली आहे. जिल्ह्यात कोरोना होण्याचे प्रमाण पाहिले तर 16.48 टक्के इतके आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उस्मानाबाद कोरोना मीटर 

एकुण रुग्णसंख्या - 15565

बरे झालेले रुग्ण - 14693

उपचाराखालील रुग्ण - 314 

एकूण मृत्यु - 558 

आजचे बाधित - 32

आजचे मृत्यु - 00

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Corona Update today 32 patients