Corona : उस्मानाबाद जिल्ह्यात ३२ जणांना लागण, दोन जणांचा मृत्यू 

तानाजी जाधवर
Saturday, 28 November 2020

जिल्ह्यामध्ये आज शनिवारी (ता.२८) ३२ जणांना कोरोनाची लागन झाली असुन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यामध्ये मृत्युचे सत्र थांबले होते, मात्र शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. शनिवारी एका दिवसामध्ये ३९ जणांना बरे करुन घरी पाठविले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये आज शनिवारी (ता.२८) ३२ जणांना कोरोनाची लागन झाली असुन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यामध्ये मृत्युचे सत्र थांबले होते, मात्र शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. शनिवारी एका दिवसामध्ये ३९ जणांना बरे करुन घरी पाठविले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १४ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के इतके आहे. तर आजच्या दोन मृत्युने मृत्युचा दर ३.६१ टक्के इतका झाला आहे. भुम तालुक्यातील वडाचीवाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान कोरोनाने बळी गेला आहे. तसेच उस्मानाबाद तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. दोन्ही रुग्णाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या ३२ जणापैकी १९ जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. तर ११ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यातही १४३ जणांची स्वॅब चाचणी घेतल्यानंतर त्यातील १९ जणांना लागन झाली होती. तर २६६ जणांची अँटिजेन टेस्ट केल्यानंतर ११ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दोन जणांना इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. जिल्ह्याचा विचार करता उस्मानाबाद तालुक्यामध्ये नऊ, तुळजापुर चार, उमरगा दोन, लोहारा एक, कळंब तीन, वाशी पाच, भुम तीन व परंडा पाच अशी तालुकानिहाय आकडेवारी समोर आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ९७ हजार २९७ इतक्या संशयिताची तपासणी करण्यात आली असुन त्यातील १५ हजार ७०६ जणांना कोरोनाची लागन झाल्याचे दिसुन येत आहे. त्याचे प्रमाण १६.१४ टक्के इतके आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - १५७०६
  • बरे झालेले रुग्ण- १४८१८
  • उपचाराखालील रुग्ण- ३२१
  • एकुण मृत्यु - ५६७
  • आजचे बाधित - ३२
  • आजचे मृत्यु - ०२

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad district 32 people new corona patient