esakal | उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रण पेटणार, राजकीय पक्षांकडून तयारी सुरु 
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad District Cooperative Bank Election News

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बार उडणार असल्याने सर्वच पक्षांकडून आतापासून रणनीती आखायला सुरुवात होणार असे दिसत आहे.

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रण पेटणार, राजकीय पक्षांकडून तयारी सुरु 

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होईल असे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रण पेटणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बार उडणार असल्याने सर्वच पक्षांकडून आतापासून रणनीती आखायला सुरुवात होणार असे दिसत आहे. जुन्या यादीप्रमाणे ही निवडणूक घेणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जुन्या यादीप्रमाणे ठराव घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे.

औरंगाबादेतील सातारा डोंगराला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग शमविण्याचे प्रयत्न सुरु  

त्यामुळे त्याला अवघे दोन ते दिवस लागण्याची शक्यता आहे. ही यादी अंतिम झाल्यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर होणार आहे. साधारण या महिन्याच्या शेवटपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होऊन प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होईल. मार्च महिन्यामध्ये हा कार्यक्रम जाहीर झाला तर ३५ दिवसांत संपविण्याचा नियम आहे. त्याचा विचार केला तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष मतदान होणार असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची फक्त चर्चाच ऐकायला मिळत होती.

बीड जिल्ह्यातील सरपंच निवडीचा मुहूर्त अखेर जाहीर, विशेष सभा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पण ती नेमकी कधी होणार याबाबत उत्सुकता लागून होती. आता ही उत्सुकता संपणार असून काही दिवसांमध्ये त्याचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये या अगोदर राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्ष असे राजकीय समीकरण पाहायला मिळत असे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप यांच्यामध्ये अंतर्गत आघाडी झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. 

अध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा?
आमदार राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्याने राजकीय समीकरण व संदर्भ पूर्ण बदलले आहेत. भाजपच्या विरोधात राज्यभर महाविकास आघाडी असे चित्र आहे. जिल्ह्यात तर अगोदरच आमदार पाटील यांच्याविरोधात सर्व पक्ष असे समीकरण पाहायला मिळत होते. त्यातही आता आमदार पाटील यांच्या विरोधकांसाठी ही चांगलीच संधी असून महाविकास आघाडी एकत्र येण्यास या क्षणालाही अडचण नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आता सध्या भाजपच्या विचाराच्या लोकांची संख्या जिल्हा बँकेत जास्त असली तरी अध्यक्ष मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. 

संपादन - गणेश पिटेकर