esakal | बीड जिल्ह्यातील सरपंच निवडीचा मुहूर्त अखेर जाहीर, विशेष सभा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Sarpanch Appointments News

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १२९ ग्रामपंचायतींवर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही महिने प्रशासकांनी काम पाहिले.

बीड जिल्ह्यातील सरपंच निवडीचा मुहूर्त अखेर जाहीर, विशेष सभा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होऊन ता.१५ जानेवारीला निवडणुका झालेल्या १२९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडीचा मुहूर्त जाहीर झाला आहे. येत्या सोमवार (ता. १५) ते बुधवार (ता. १७) या तीन दिवसांत सरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तहसिलदारांना दिले आहेत. दरम्यान, निवडणुका आणि काही बिनविरोध निवडी झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद आरक्षित असलेल्या प्रवर्गाचे उमेदवारच नसल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादेतील सातारा डोंगराला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग शमविण्याचे प्रयत्न सुरु  

त्यामुळे या गावांत उपसरपंचांच्या निवडी होऊन सरपंचपद रिक्त असल्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल. शासनाच्या पुढील निर्देशानंतर सरपंचपदाबाबत काय तो निर्णय हेाईल. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १२९ ग्रामपंचायतींवर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही महिने प्रशासकांनी काम पाहिले. अखेर डिसेंबरमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन ता.१५ जानेवारीला मतदान आणि ता.१८ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. दरम्यान, यातील १८ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

तरुणीवर अत्याचारप्रकरणी  सैन्यदलातील जवानाविरुद्ध आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल

यात काही ग्रामपंचायतींसाठी आर्थिक बोली लागल्याच्या तक्रारींवरून चौकशाही सुरु आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीअगोदर झालेली आरक्षण सोडत नंतर रद्द झाली. पुन्हा सरपंच निवडीनंतर आरक्षण सोडत झाली. यात फारसे बदल झाले नाहीत. दरम्यान, निवडणुका हेाऊन तीन आठवड्यांचा कालावधी उलटल्याने सरपंच निवडी कधी? याकडे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी (ता.नऊ) उशिरा जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी सरपंच निवडीबाबत विशेष सभा घेण्याचे पत्र तहसिलदारांना दिले. ता. १५ ते १७ या तीन दिवसांत सरपंचांच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्याचे सांगण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

तालुकानिहाय होणाऱ्या सरपंच निवडी 
- गेवराई : २२. 
- माजलगाव : ५. 
- वडवणी : ०२. 
- धारूर : ०५. 
- केज : २३. 
- अंबाजोगाई ०७. 
- परळी : ०७. 
- बीड : २९. 
- आष्टी : १२. 
- शिरूर कासार : ०८ 

संपादन - गणेश पिटेकर