esakal | उस्मानाबाद : मृताचा मोबाईल चोरीप्रकरणी रुग्णालयाकडून पोलिसांत तक्रार 
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal_Impact_32.jpg

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचा मोबाईल, दागिने आणि एटीएम कार्ड काढून घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दखल घेत शहर पोलिस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली आहे. 

उस्मानाबाद : मृताचा मोबाईल चोरीप्रकरणी रुग्णालयाकडून पोलिसांत तक्रार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचा मोबाईल, दागिने आणि एटीएम कार्ड काढून घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दखल घेत शहर पोलिस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात चोरट्यांचा सुळसुळाट असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

 अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.
मस्सा खंडेश्‍वरी (ता. कळंब) येथील अंकुश ताटे यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. मंगळवारी (ता. नऊ) कळंब शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ते दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीसह मुलगाही होता. रुग्णालय प्रशासनाने सर्वांची तपासणी करीत स्वॅब नमुने घेऊन त्या तिघांनाही कळंब येथील आयटीआय येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
मात्र अंकुश ताटे यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यासोबत मुलाला किंवा आईला पाठवावे, अशी विनंती त्या दोघांनी डॉक्टरांकडे केली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास अंकुश ताटे यांनी मोबाईलवरून पत्नी आणि मुलाशी चर्चा केली. ‘मला तिसऱ्या मजल्यावर चालवत नेले आहे. त्यामुळे थोडासा त्रास होत असून, आराम करीत आहे. मी सुरक्षित असून, तुम्ही जेवण करा. काळजी करू नका,’ असे त्यांनी मुलगा, पत्नीला सांगितले. 
मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १०) सकाळी सात वाजता अंकुश यांच्याच फोनवरून एका परिचारिकेने कळंब येथील कोविड सेंटरला ताटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ‘ताटे पेशंट एक्स्पायर झाले आहेत’ असे त्यांनी सांगितले होते.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

याबाबातचे वृत्त ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. १७) प्रसिद्ध झाले. या वृत्ताची रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रुग्णालयाच्या आयसीयू कक्षातून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. दरम्यान, सात दिवसांपूर्वी चोरीचा प्रकार घडला आहे. तरीही चोरीची तक्रार देण्यासाठी तब्बल सात दिवस घालविले.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

त्यामुळे आयसीयू कक्षातील कोणीतरी चोरी केली असून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. ज्या कर्मचाऱ्याने अंकुश ताटे यांच्या मृत्यूची माहिती ताटे यांच्याच फोनवरून नातेवाइकांना दिली होती, त्यांना या प्रकरणात जाब विचारल्यानंतर छडा लागू शकतो, अशी चर्चा रुग्णालय प्रशासनात सुरू झाली आहे. 
 

loading image