Corona-virus : उस्मानाबाद जिल्ह्यात आज दहा पॉझिटिव्ह; ६० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू   

तानाजी जाधवर
Wednesday, 22 July 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या आता ५८३ वर पोहचली आहे. त्यामध्ये ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. २०६ जण सध्या उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या २९ वर पोहचली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालामध्ये दहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरातील उंबरे गल्लीतील ६० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. बाधितामध्ये चार जण हे रॅपिड अँटीजेन टेस्टमधून तर सहा जण अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातून आलेल्या अहवालामध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून सोमवारी (ता.२०) ७६ स्वॅब नमुने तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये सहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये चार जण आहेत. ५५ वर्षीय पुरुष (रा. ख्रिस्तियन इंग्लिश स्कूल जवळ, मिली कॉलनी, उस्मानाबाद), त्यातही अँटीजेन टेस्टमधून दोन जणांचा समावेश आहे. ५८ वर्षीय पुरुष, (रा. १६ नं गल्ली, खाजा नगर उस्मानाबाद) २८ वर्षीय पुरुष (रा. गवळी वाडा, तांबरी विभाग, उस्मानाबाद.). ८० वर्षीय पुरुष (रा. हनुमान मंदिराजवळ, तेरखेडा ता. वाशी)  उमरगा तालुक्यातुन एकुण सहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ५६ वर्षीय पुरुष. (रा. मशालकर गल्ली, उमरगा), ३० वर्षीय महिला (रा. माशाळकर गल्ली, उमरगा), १७ वर्षीय तरूणी (रा. माशाळकर गल्ली, उमरगा), ३६ वर्षीय पुरुष (रा. उमरगा), ७० वर्षीय पुरुष (रा.मुनशी प्लॉट,उमरगा), ५० वर्षीय पुरुष. (रा. कुंभार पट्टी, उमरगा), रॅपिड अँटीजेन टेस्ट्सच्या माध्यमातून २७ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामळे आज एकूण दहा रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

६० वर्षीय महिलेचा मृत्यू 

६० वर्षीय महिला. रा. उंबरे गल्ली, यांचा मृत्यु झाल्याचेही जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या आता ५८३ वर पोहचली आहे. त्यामध्ये ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. २०६ जण सध्या उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या २९ वर पोहचली आहे.

(संपादन : प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad district today 10 new positive and 60 year old lady death