उस्मानाबादकर चिंतातुर : जिल्ह्यात दिवसभरात आठ जण कोरोना पॉझिटिव्ह

file photo
file photo

उस्मानाबाद : जिल्ह्यात आज सकाळी तीन रुग्णांची भर पडली. उस्मानाबाद शहर, तेर आणि कळंब (शिराढोण) येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, रात्री आलेल्या अहवालात आणखी पाच बाधित आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ४२ वर पोचली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

कोरोना बधितांच्या संपर्कात आलेल्या, तसेच लक्षणे जाणवत असलेल्या जिल्ह्यातील ७७ संशयितांचे स्वब तपासणीसाठी मंगळवारी (ता. २६) लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत पाठवण्यात आले होते. आज सकाळी मिळालेल्या अहवालानुसार तिघे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद शहरातील रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

दरम्यान, शहरातील कोरोनाबाधीत युवकाला क्वारंटाइन करण्यात आले होते. असे असताना तो शहरात अनेक ठिकाणी फिरल्याची चर्चा आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत काल पाठवलेल्या पाच जणांच्या स्वॅब नमुन्यांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दोन अहवाल अनिर्णित आहेत. पॉझिटिव्हपैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगरातील असून, तो मुंबई येथून प्रवास करून आला आहे. दुसरा तेर येथील असून तो पुण्यातून परतला आहे.

तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण कळंब तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील आहे. दरम्यान, रात्री आलेल्या अहवालात परांडा तालुक्यातील तीन, कळंब, उमरगा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

एकूण ७७ पैकी ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर मंगळवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप अकरा संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना बधितांमध्ये परांडा तालुक्यातील तीन, तर उमरगा व कळंब तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरामध्ये एकूण आठ रुग्ण वाढले आहेत. सोमवारपर्यंत जिल्हयातील एकून रुग्णसंख्या ३४ होती. त्यामध्ये आज आठ नवीन रुग्णांची भर पडली असून, एकूण संख्या ४२ वर पोचली आहे.

नववधुवर उपचार सुरु 
उमरगा शहरातील तीन, तर तालुक्यातील तीन अशा सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी (ता. २४) रात्री पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये एका नववधूचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २५) नववधूचे नातेवाईक व छोटेखानी लग्नसमारंभाला हजर असलेले मित्रमंडळ अशा आठ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहे. लग्नाचा विधी करणाऱ्या भटजींचा स्वॅबही मंगळवारी तपासणीला पाठविण्यात आला आहे. 

उमरगा तालुक्यात यापूर्वी आढळून आलेल्या दोन बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते घरी गेले; पण मुंबई, पुणे या ‘रेड झोन’मधून गावाकडे परतणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढल्याने धोका वाढण्याची शक्यता प्रत्यक्षात खरी ठरली. एका खासगी बसमधून मुंबईहून केसरजवळगात आलेल्या महिलेसह कोथळीच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व पाच जणांवर उमरग्यातील कोविड रुग्णालयात जणांवर उपचार सुरू आहेत. 

मित्रमंडळींमध्ये वाढली धाकधूक 
शहरानजीकच्या गुंजोटी रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिर परिसरातील एका तरुणाचा १८ मे रोजी छोटेखानी विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यात नातेवाईक कमी; पण मित्रमंडळींची संख्या बऱ्यापैकी होती. नववधूच्या आत्याचा पती (काका) सोलापूर येथून आला होता.

लग्नानंतर ते सोलापूरला गेल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नववधूच्या संपर्कातील सात जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. रविवारी रात्री आलेल्या अहवालात नववधूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर पतीसह सासू, सासरे व अन्य तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com