पाहुण्यांची आधी आरोग्य तपासणी

होळी (ता. लोहारा) : परगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करताना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे पथक.
होळी (ता. लोहारा) : परगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करताना स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे पथक.

लोहारा (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील होळी ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे. मुंबई, पुणे व परराज्यांतून गावात परतलेल्या जवळपास दोनशे जणांची रविवारी (ता. २९) आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर ब्लिचिंग पावडरची फवारणी करून गावातील परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.

कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी होळी येथील ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोना सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक ती माहिती व मदत करण्यात येत आहे.

ग्रामस्तरावर कोरोनामुक्त ग्राम समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य आदींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीकडून पुणे, मुंबई शहरांतून तसेच अन्य राज्यांतून गावात परत आलेल्या सर्व नागरिकांची यादी बनवून सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने सुमारे दोनशे नागरिकांची गावातच आरोग्य तपासणी करण्यात आली.

गावातील सार्वजनिक ठिकाणी, गर्दी होणाऱ्या ठिकाणी व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. टीसीएल ब्लिचिंग पावडरयुक्त पाण्याची फवारणी करण्यात आली आहे. कोरोना या जागतिक महामारीपासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या विविध सूचनांचे पालन होण्यासाठी गावात दवंडीद्वारे, सार्वजनिक स्पीकरवरून तसेच व्हॉट्सॲप ग्रुपवर वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून माहिती दिली जात आहे.

त्यासाठी सरपंच व्यंकट माळी, ग्रामसेवक एम. के. बनशेट्टी, पोलिस पाटील अंकुश गायकवाड, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. बनसोडे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी, आशा कार्यकर्ती सुजाता गायकवाड, अंगणवाडी कार्यकर्ती शशिकला गायकवाड, रागिणी जाधव, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, संजय मनाळे, अनिल गायकवाड, हरिभाऊ जमादार, राम पाटोळे यांनी पुढाकार घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com